इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – इतिहास – भूगोल

अध्ययन अनुभव / कृती – घराच्या परिसरात आढळणाऱ्या विविध खडकांचा संग्रह कर. त्यांचे निरीक्षण कर व त्यांच्यामध्ये दिसून येणारा फरक लिहून काढ.
आता पुढील माहिती वाचून खडकांचे प्रकार समजून घे.
- खडकांचे प्रकार
निर्मितीप्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.
• अग्निजन्य खडक / अग्निज खडक/मूळ खडक
• गाळाचे खडक / स्तरित खडक
● रूपांतरित खडक
• अग्निजन्य खडक
ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.
गाळाचे खडक
तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील ख विरघळतात. अशाप्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात.
रूपांतरित खडक
पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू-हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्फटिकीकरण होते. म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकांत जीवाश्म आढळत नाहीत.
