♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 40

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 40

विषय  – इतिहास – भूगोल  


अध्ययन अनुभव / कृती

आतापर्यंत तु आदिमानय ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटनांचा अभ्यास केला. आधुनिक मानवाच्या इतिहासातील महत्वाची घटना म्हणजे विविध नागरी संस्कृतींचा विकास. शेवटच्या भागात प्रमुख चार नागरी संस्कृतींची माहिती पाहू.

१. मेसोपोटेमिया मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. याचा अर्थ दोन बयांच्या मधल्या प्रदेशास मेसोपोटेमिया म्हटले जाते, यालाच दुआब म्हणून ओळखले जाते. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या मधील प्रदेश. या दोन्ही नद्या प्रामुख्याने

तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. मेसोपोटेमिया मध्ये उर, उसक, निपुर यांसारखी प्राचीन नगरे होती. या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती.

२. इजिप्त आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. नाईल नदीच्या खोयात जगातील समृद्ध अशी इजिप्तची प्राचीन संस्कृती बहरली. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. पुराच्या पाण्यासोबत नदीच्या काठांवर गाळ आणून टाकला जातो, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून तिच्या पुराचे पाणी साठवत असत. त्यातील गाळ खाली बसला की, त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाई.

३. चीन चीनमधील होयांग हो नदीच्या खोयात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चिनी परंपरेनुसार हुआँग दी या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याची तंत्र शोधून काढले, असे चीनी लोक मानतात. चीनमधील बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती.

४. हडप्पा संस्कृती भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. हडप्पा संस्कृतीतील व उररचनेची वैशिष्ट्ये –

१. नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणारे रस्ते होते. २. त्यामुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. ३. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे हेही एक या नगरांचे वैशिष्ट्ये होते. ४. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे हडप्पा संस्कृतीत होती. ५. घरोघरी स्रानगृह, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. ६. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. ७. नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे.

काय समजले ?

वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

उत्तर : ………………………………………….

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1 मेसोपोटेमिया संस्कृती कोठे विकसित झाली?

2 कोणत्याही नदीकाठची जमीन सुपीक का होते?

3 इजिप्तमध्ये सिंचनासाठी पाणी कसे उपलब्ध केले जाई?

4 हडप्पा संस्कृतीतील नगररचना कशी होती?

5 प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये मनोरंजन कसे करत?


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment