इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 23

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  23

विषय  – इतिहास – भूगोल  

करून पाहूयात

  • नजीकच्या काळात गावात तात्पुरती वस्ती करून राहणाऱ्या / भटकणाऱ्याा लोकांची माहिती मिळव. उदा. राहणीमान, व्यवसाय, लहान मुलांच्या शिक्षणाची सुविधा, आरोग्याची सुविधा
  • ग्रामीण भागातील घरे व शहरी भागातील घरांच्या रचनेतील फरकाचे निरिक्षण कर
  • ग्रामीण भागातील व्यवसायांची माहिती मिळव.
  • शेतीसाठी आवश्यक साहित्याची यादी कर.

अध्ययन अनुभव / कृती –

बदलत्या हवामानामुळे पर्यावरणात बदल होऊ लागला व त्यामुळे बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल झाला. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाची समूह दूरवरच्या प्रदेशात पर्यंत भटकंती करू शकत होते. बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. पुढे बुद्धिमान मानवाचे तात्पुरत्या वस्तीचे कल्पनाचित्र दिले आहे. या कल्पनाचित्राचे निरीक्षण करुण  बुद्धिमान मानवाचे हंगामी तळात दैनंदिन राहणीमान कसे असेल त्याविषयी लिही.

……………………………………….……………………………………….

……………………………………….……………………………………….

 खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

बुद्धिमान मानव हंगामी तळामध्ये फळे-कंदमुळे गोळा करणे, त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, ही कामे करत होते तसेच मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा शेतकरी करून घेत होते, कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. अशा कारणांमुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागले. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत. 

पुराश्मयुग व मध्याश्मयुगाच्या काळात मानव बहुतांश भटके जीवन जगला. नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पूर्णतः बदलली. नवाश्मयुगात मानव स्थिर कसा झाला ते पाहू. नवाश्मयुगामध्ये मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात शिकार करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणी राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एकेठिकाणी स्थिरावल्या.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१ तात्पुरत्या वस्तीत बुद्धिमान मानव कोणते काम करत? 

उत्तर : ………………………………………….

२ तात्पुरत्या वस्तीत बुद्धिमान मानव कोणते निरीक्षण करत? 

उत्तर : ………………………………………….

३ नवाश्मयुगात मानवाला शिकारीची गरज का राहिली नाही? 

उत्तर : ………………………………………….

४ मानव एके ठिकाणी मुक्काम का करू लागला?

उत्तर : ………………………………………….


Leave a comment