इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – इतिहास – भूगोल

हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तु काय करशील ते लिही.
उत्तर : ………………………………………….
खालील माहिती वाचा व समजावून घ्या
थंडीमध्ये आपण उबदार कपडे वापरू, कानटोप्या व मफलरचाही वापर करू. खूपच जास्त थंडी असेल तर शेकोटीचाही उपयोग करता येईल. हजारो वर्षांपूर्वी शक्तिमान मानव गुहांमध्ये राहत होता हे तु मागच्या पाठात पहिले आहे. त्यावेळी युरोपात हवामान अतिशीत होते म्हणजेच खूपच थंड, गोठवून टाकणारे होते. अशा अतिशीत वातावरणात शक्तिमान मानवाने शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे स्वत:चे थंडीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले होते. त्यांनी गरज असेल तेथे उघड्यावर झोपड्याही बांधल्या होत्या.

मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते आणि त्यामुळे सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागले. त्याचा परिणाम मध्याश्मयुगीन काळातील बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता. याच काळात वाढलेलेशिकारीचे प्रमाण आणि पर्यावरणातील बदल यामुळे मॅमोथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले.

मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज तो हत्तीपेक्षा आकाराने मोठा, अंगावर खूप केस असलेला व मोठे दात असलेला प्राणी होता. वाढलेले शिकारीचे प्रमाण आणि पर्यावरणातील बदल यामुळे महाकाय प्राण्यांची संख्या कमी झाली म्हणून बुद्धिमान मानव आता मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला. सोबतच रानडुक्कर, हरीण, डोंगरी शेळी, मेंडीसारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला.
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
उत्तर : ………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१.युरोपात अतिशीत हवामान केव्हा होते?
उत्तर : ………………………………………….
२. शक्तिमान मानवाने थंडीपासून स्वतःचे संरक्षण कसे केले?
उत्तर : ………………………………………….
३.मानवाने तंबू कोठे उभे केले ?
उत्तर : ………………………………………….
४.मानवाने कोणत्या लहान प्राण्यांची शिकार केली?
उत्तर : ………………………………………….
अधिक सराव करू
१. मॅमोथसारखे महाकाय प्राणी कसे नष्ट झाले?
उत्तर : ………………………………………….
२. मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहारात बदल का झाला?
उत्तर : ………………………………………….
३. बुद्धिमान मानवाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी का सुरु केली?
उत्तर : ………………………………………….