coronavirus : TikTok चे भारताला १०० कोटींचे मेडिकल सूट आणि २ लाख मास्क – coronavirus tiktok donates 100 crore medical suits and mask to indian government

[ad_1]

नवी दिल्लीः करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी चीनच्या व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉकने भारत सरकारला मदत जाहीर केली आहे. टिकटॉकडून १०० कोटींचे मेडिकल इक्विपमेंट दिले आहेत. ज्यात ४,००,००० प्रोटेक्टिव सूट आणि २,००,००० मास्कचा समावेश आहे. या निर्णयामुळे करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी थोडी मदत होईल, असे टिकटॉकने म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

BSNLची नवी ऑफर, ५०० GB डेटा मिळणार

आम्ही भारताला प्रोटेक्टिव सूट आणि मास्क डॉक्टर्सच्या सुरक्षेसाठी दिले असल्याचे टिकटॉकने म्हटले आहे. व्हायरसच्या संपर्कात सर्वात जास्त डॉक्टर्स राहतात. त्यामुळे डॉक्टरांना करोनाचा संसर्ग होण्याची सर्वात जास्त भीती आहे, असे टिकटॉकने म्हटले आहे. टिकटॉकच्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले की, सध्या भारतात जी कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीत आम्ही भारतासोबत आहोत, असे टिकटॉकने म्हटले आहे.

गुगलचे Shorts देणार TikTok ला टक्कर

दिल्ली-महाराष्ट्राला २ लाख मास्क

टिकटॉकने दिल्ली आणि महाराष्ट्र राज्याला सरकारी मेडिकल कर्मचाऱ्यांसाठी २ लाख मास्क दिले आहेत. तसेच आगामी काळात टिकटॉक भारतासोबत असून मदत करणार असल्याचे टिकटॉकने म्हटले आहे.

एल अँड टीची आर्थिक मदत

लार्सन अँड टर्बो Larsen & Toubro (L&T)ने कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मदत निधीत १५० कोटींची मदत दिली आहे. तसेच कंपनीने १.६० लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे.

‘व्हर्च्युअल भटकंती’ करायचीय?, ‘या’ आयडिया



[ad_2]

Source link

Leave a comment