computer News : विंडोजवर वेबसाइट कशा ब्लॉक कराव्या? – how to block any website on your computer

[ad_1]

नीरज पंडित

लहान मुलांसाठी वेबसाइट ब्लॉक करण्याचे प्रकार अनेक घरांमध्ये होत असतात. पण, सध्या लॉकडाउनच्या काळात मोठ्या माणसांसाठीही अशा प्रकारे वेबसाइट ब्लॉक करण्याची गरज आता निर्माण होऊ लागली आहे. एका सर्वेक्षणानुसार ६७ टक्के युजर्स रोज ऑनलाइन गेम खेळल्याशिवाय आपल्या कामाला सुरुवात करत नाहीत. तसंच ४७ टक्के लोक काम सुरू असताना मध्ये-मध्ये काही वेळ ऑनलाइन गेम खेळत असतात. हे टाळण्यासाठी स्वयंशिस्त लावणं आवश्यक असतं. ज्यांना या गेमपासून लांब राहायचं आहे ते आपल्या वेब ब्राऊझरमध्ये जाऊन त्या साइट ब्लॉक करू शकतात. त्या कशा करायच्या हे आपण आज पाहणार आहोत.

विंडोजवर वेबसाइट कशा ब्लॉक कराव्या?

जर तुम्ही एकाच कम्प्युटरवर बसून ऑनलाइन गेम खेळत असाल आणि त्या कम्प्युटर पुरतं तुम्हाला वेबसाइटचा वापर बंद करायचा असेल तर तुम्ही होस्ट फाइल्सचा वापर करून हे करू शकता. विंडोज एक्सपी आणि त्यावरील ऑपरेटिंग प्रणालीमध्ये तुम्ही सर्च बॉक्समध्ये C:WINDOWSsystem32driversetc असं टाइप करा. यानंतर तुम्ही तो फोल्डर उघडल्यावर होस्टही फाइल नोटपॅडमध्ये ओपन करा. तिथं तुम्हाला 127.0.0.1 localhost असं लिहलेलं दिसेल. त्याच्याखाली तुम्ही 127.0.0.1 असं लिहून तुम्हाला जी वेबसाइट बंद करायची आहे तिचा युआरएल टाका. उदाहणार्थ, ‘127.0.0.1 abc.com’ असं टाइप करा. त्यानंरत ते सेव्ह करून ती नोटपॅडची फाइल बंद करा. ते केल्यावर ती वेबसाइट तुमच्या संगणकावरील सर्व वेब ब्राऊझरवर बंद होते. हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पण जर तसं जमलं नाही तर तुम्ही ब्राउझर नुसारही वेबसाइट ब्लॉक करू शकता.

फायरफॉक्स बाऊजरवर साइट ब्लॉक करताना…

– बाऊझरच्या टूलवर क्लिक करा आणि अॅडऑन बटणमध्ये जा.

– मग तुमच्यासमोर अॅडऑनचे पान सुरू होईल. त्यात ब्लॉकसाइट या नावानं सर्च करा. तुम्हाला अॅडऑन मिळेल तो सिलेक्ट करा आणि ब्राऊजरमध्ये अॅड करा. यानंतत फारपॅाम्ब्स बंद करून मग पुन्हा सुरु करा.

– मग तुम्ही फायरफॉक्समधील तो अॅडऑन निवडा तिथं तुम्हाला ब्लॉक वेबसाइटचा पर्याय दिसेल. जी वेबसाइट वापरायची नाही त्याचा युआरएल टाका आणि साइट ब्लॉकरची विडो बंद करण्यापूर्वी सेव्ह करा आणि बंद करा. मग तुम्ही ती वेबसाइट ब्लॉक झालेली असते.

क्रोम ब्राऊजरवर साइट ब्लॉक करताना…

– यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलचं एक्स्टेन्शन घ्यावं लागेल. क्रोम बाऊजर सुरू झाल्यावर उजव्या कोपऱ्यात येणारी तीन ठिपक्यांच्या चिन्हावर क्लिक करा.

– तिथं तुम्ही तुम्हाला पाहिजे ते एक्स्टेन्शन विकत घेऊ शकता.

– मग तुमच्यासमोर अॅडऑनचं पान सुरू होईल. त्यात ब्लॉकसाइट या नावानं सर्च करा. तुम्हाला अॅडऑन मिळेल तो सिलेक्ट करा आणि ब्राउजरमध्ये अॅड करा. यानंतर क्रोम बंद करून मग पुन्हा सुरु करा.

– मग तुम्ही क्रोमला तो अॅडऑन निवडा. तिथं तुम्हाला ब्लॉक वेबसाइटचा पर्याय दिसेल. जी वेबसाइट वापरायची नाही त्याचा युआरएल टाका आणि साइट ब्लॉकरची विंडो बंद करण्यापूर्वी सेव्ह करा. नंतर बंद करा. यानंरत पुन्हा ब्राऊजर सुरू केल्यावर ती वेबसाइट सुरू होणार नाही.

इंटरनेट एक्स्पलोररमध्ये साइट ब्लॉक करताना…

– यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक्स्पोलरवरील एक्स्टेन्शन घ्यावं लागेल.

– तिथं तुम्ही तुम्हाला पाहिजे ते एक्स्टेन्शन विकत घेऊ शकता.

– मग तुमच्यासमोर अॅडऑनचं पान सुरू होईल. त्यात ब्लॉकसाइटचा मजकूर आलेला आहे. या नावानं सर्च करा. तुम्हाला अॅडऑन मिळेल तो सिलेक्ट करा आणि ब्राऊजरमध्ये अॅड करा. यानंतर इंटरनेट एक्स्प्लोरर बंद करून मग पुन्हा सुरु करा.

– मग तुम्ही क्रोमला तो अॅडऑन निवडा तेथे तुम्हाला ब्लॉक वेबसाइटचा पर्याय दिसेल. जी वेबसाइट वापरायची नाही त्याचा युआरएल टाका. साइट ब्लॉकरची विंडो बंद करण्यापूर्वी सेव्ह करा आणि नंतर बंद करा. यानंतर पुन्हा ब्राऊजर सुरू केल्यावर ती वेबसाइट सुरू होणार नाही.

[ad_2]

Source link

Leave a comment