Asus Smartphones Sale : आसूसचा आजपासून सेल, ‘या’ फोन्सवर ४००० ₹ सूट – flipkart sale: asus 6z, asus 5z, and more asus smartphones available with up to rs 4,000 off

[ad_1]

नवी दिल्लीः आसुस (Asus) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सेल सुरू केला आहे. फ्लिपकार्टवर आजपासून सेल सुरू करण्यात येणार असून या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४ हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. हा सेल २१ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे.

Asus 6Z (४ हजारांपर्यंत सूट)

६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये इतकी आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोनसह सर्व फोनवर ४ हजारांची सूट दिली जात आहे.


Asus 5Z (३ हजारांपर्यंत सूट)


६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनवर ३ हजारांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.

Asus Max Pro M1 (५०० रुपयांची सूट)

आसुसचा हा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन ८ हजार ४९९ रुपयांना तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन ११ हजार ४९९ रुपयांना मिळतोय. या दोन्ही फोनवर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Asus Max M2 (५०० रुपयांची सूट)

३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनवर या सेलमध्ये ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.

सावधान! ‘अशी’ होतेय इंटरनेटवरून फसवणूक

दूरसंचार कंपन्या थकित रक्कम भरणार

फोटोः BSNLची प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी ‘ऑफर’

iPhone XR वर ३४ हजारांची ‘बंपर’ सूट



[ad_2]

Source link

Leave a comment