[ad_1]
शाओमी या इलेक्ट्रिक टूथब्रशची विक्री १० मार्चपासून सुरू करणार आहे. या टूथब्रशचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात २५ दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. या टूथब्रशला चार्ज करण्यसाठी USB-C टाइप अडॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. हा IPX7 वॉट रेसिस्टेंट आहे. म्हणजेच हा ब्रश पाण्याने धुवू शकता. त्याला काहीच नुकसान होणार नाही. या ब्रशला प्लास्टिक हेड असल्याने याला स्टोर करणे सहज शक्य होणार आहे. शाओमीने या इलेक्ट्रिक ब्रशमध्ये DuPont TyneX StaClean ब्रिसल्स दिले आहेत. त्यामुळे दोन दातामध्ये जाऊन हे टूथब्रश चांगले सफाई करू शकते. या ब्रशमध्ये मॅग्नेटिक लेविटेशन सोनिक मोटरचा वापर केला आहे. एका मिनिटात ३१००० वेळा व्हायब्रेट होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात दोन ब्रशिंग मोड आहे. याची डिझाइन खूप सोपी आहे. या टूथब्रशला पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आले आहे. हा ब्रश लवकर ओळखता यावा यासाठी कंपनीने एक कलरफुल रिंगचा वापर केला आहे.
Havells चा स्मार्ट ‘फॅन’; आवाजाने होणार बंद
जगाला ‘Cut, Copy, Paste’ देणाऱ्या लॅरी टेस्लर यांचं निधन
[ad_2]
Source link