१५ दिवस देशभर मोफत मिळणार फास्टॅग

महामार्गांवरील टोलवसुली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १५ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांसाठी वाहनधारकांना देशभर मोफत फास्टॅग  उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.


एरवी फास्टॅगसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. या १५ दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम व वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. महामार्गांवरील टोकनाके, आरटीओ कार्यालये, सामायिक सेवाकेंद्रे, पेट्रोल पंप अशा ठिकाणी नि:शुल्क फास्टॅग मिळू शकतील. ं

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment