[ad_1]
रियलमी सी३ भारतात आज दुपारी साडे बारा वाजता लाँच होणार आहे. या लाँचचा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून लाइव्ह दिसणार आहे. तसेच तुम्ही Realme India च्या अधिकृत फेसबुक पेज आणि अधिकृत ट्विटर हँडलवरून लाँच इव्हेंटचे लाइव्ह अपडेट पाहू शकतात. भारतात लाँच होणाऱ्या या फोनची थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. Realme C2 भारतात लाँच झाला त्यावेळी त्याची किंमत ५ हजार ९९९ रुपये होती. आता मात्र Realme C3 मागे मॉडेलच्या तुलनेत गेमिंगवर फोकस करण्यात आले आहे. या फोनमध्ये चिपसेट आणि ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. त्यामुळे रियलमी सी२ पेक्षा या फोनची किंमत जास्त असणार आहे.
रियलमीच्या अधिकृत ट्विटमध्ये अधिकृतपणे सांगितले होते की, Realme C3 मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. हे वॉटरड्रॉप स्टाइल नॉच सह असणार आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन -टू-बॉडी रेशियो ८९:८ टक्के असणार आहे. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात येणार आहे. Realme C2 मध्ये Mediatek Helio G70 चिपसेट दिला जाणार आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर असणार आहे. रियलमी सी३ ला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात लाँच करण्यात येणार आहे. सध्या या फोनची किंमत किती असू शकते, हे कंपनीने अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेले नाही.
सॅमसंगचा Galaxy A70s फोन २०००₹ स्वस्त
लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल
[ad_2]
Source link