[ad_1]
मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टीझर जारी केला आहे. यात नवीन रेडमी फोनला लवकरच लाँच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. व्हिडिओत सविस्तर काहीच माहिती नाही. परंतु, मनु कुमार जैन यांनी म्हटलेय की, रेडमीची ओळख पॉवरने होते. त्यामुळे नवीन फोन बॅटरी लाइफवर असू शकतो. यात त्यांनी पॉवरफुल प्रोसेसर आणि पॉवरफुल युजर एक्सपिरियन्स देण्याचा विश्वास दिला आहे. यासाठी त्यांनी #MorePowerToRedmi हॅशटॅगचा वापर केला आहे. त्यांचे हे ट्विट Redmi Note 9 कडे इशारा करतेय. कारण, Redmi Note 7 सीरिजला फेब्रुवारी २०१९ मध्ये लाँच केले होते. जर कंपनी हेच धोरण स्वीकारणार असेल तर रेडमी नोट ९ सीरिज लाँच करण्याला फार वेळ राहिला नाही. Redmi Note 8 ला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आले होते. या मोबाइलमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर आणि ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर Redmi Note 8 Pro मध्ये हीलिओ जी९० टी प्रोसेसर आणि ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Smooth, suave, POWERFUL! ⚡ #Power has a new look. Coming soon on @RedmiIndia #MorePowerToRedmi! Can you guys gue… https://t.co/XH4LYYERzV
— Manu Kumar Jain (@manukumarjain) 1580882631000
Redmi 9 सीरिजला आणण्याची तयारी सुरू आहे. कारण, रेडमी ७ ला मार्च महिन्यात लाँच केले होते. भारतात गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच केले होते. रेडमी ९ मध्ये मीडियाटेक हीलियो जी७० प्रोसेसर असणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या फोनला २०२० मधील पहिल्या तिमाहीत लाँच करण्याची शक्यता आहे. ही सर्व शक्यता आहे. कंपनीकडून अद्याप याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. शाओमी आपल्या रेडमी सीरिज अंतर्गत नवा फोन लाँच करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘शाओमीचा सुपर सेल’ सुरू; ४ हजारांपर्यंत सूट
करोना व्हायरसमुळे Apple ला मोठे नुकसान
[ad_2]
Source link