Airtel Netflix Plans : Airtel युजर्संना झटका; ‘ही’ खास सेवा अखेर बंद – airtel stopped free netflix subscription for its postpaid and broadband plans

[ad_1]

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आपल्या सर्व प्लानसोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत देते. जिओसारखी सेवा एअरटेलने अनेक प्लानवर सुरू केली होती. अनेक प्लानवर नेटफ्लिक्स सारख्या अॅप्सची सुविधा मोफत देणे एअरटेलने सुरू केले होते. परंतु, आता कंपनीने आपल्या काही प्लानवरील नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलच्या ज्या प्लानवर ही सुविधा देणे सुरू होती ती आता बंद करण्यात आली आहे. त्यात एअरटेल Xstream फायबर ब्रॉडबँड आणि पोस्टपेड प्लानचा समावेश आहे. दरम्यान, व्होडाफोन आणि अॅक्ट फायबरनेट यासारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपली सेवा अद्याप सुरू ठेवली आहे. भारती एअरटेलने आपल्या काही पोस्टपेड आणि ब्राँडबँड प्लानसोबत ३ महिन्यांचा नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनची ऑफर दिली होती. परंतु, ती ऑफर आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने आपल्या वेबसाइटवर अपडेट केली आहे. ज्या युजर्संना ही सुविधा देण्यात आली आहे. त्यांची सेवा वैधता असेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

एअरटेलचे नवीन पोस्टपेड आणि ब्राँडबँड ग्राहकांसाठी फ्री मध्ये नेटफ्लिक्स उपलब्ध केली नसली तरी अन्य सुविधा सुरूच ठेवल्या आहेत. एअरटेलच्या पोस्टपेड आणि ब्राँडबँड प्लानसह अॅमेझॉन प्राइम, Zee5 आणि Xstream यासारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. उदा. एअरटेलच्या ४९९ रुपये महिन्याच्या पोस्टपेडवर ग्राहकांना ७५ जीबी डेटा आणि अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. यासाठी एक वर्षापर्यंत अॅमेझॉन प्राइम मेंबरशीप, Zee5 आणि Xstream यासारख्या अॅप्सशिवाय हँडसेट प्रोटेक्शन मिळते.


वोडाफोन, एअरटेलचा ७४९ रु. चा प्लान..कोणता चांगला?

एचडी डिस्प्लेचा Lava Z53 भारतात लाँच, पाहा किंमत

Moto G8 Plus स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Moto G सीरिजच्या १० कोटी स्मार्टफोनची विक्री



[ad_2]

Source link

Leave a comment