मूर्खाचा मालक marathi goshti,chan chan goshti
एक साधू रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. साधू त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला.
तेव्हा अस्वल म्हणाले, ‘महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची केले नाहीत, माझा धर्म आहे तो.’
तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी साधू त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला.
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
कष्टाची भाकर
येथे क्लिक करा
साधू विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. साधूची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले.पण एक धटिंगण माशी साधूच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती.
त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण साधूचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला
तात्पर्य : शहाण्याचा सेवक व्हावे पण मूर्खाचा मालक होऊ नये.