पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
+ जाणून घेऊया
केशव : बापरे ! केवढी ही गर्दी आणि किती ह्या गाड्या !
बाबा: तू आज पाहतोस होय ही गर्दी! रोजच अशी गर्दी असते इथे.
केशव: एवढी सगळी माणसं कुठ चालली असतील बर ! ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल
डिझेल लागत असेल ?
बाबा: आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय ?
केशव : गर्दी, धूर, वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय, असं झालं आहे मला
शिक्षकांनी वरील उतारा फळ्यावर सुवाच्य अक्षरात लिहून विद्यार्थ्यांना त्याचे वाचन करण्यास सांगावे वाचन झाल्यानंतर त्यांना पुढील प्रश्न विचारावेतव त्याची उत्तरे वहीत लिहिण्यास सांगावी.
प्रश्न: १) हा संवाद कोठे झाला असेल ?
२) हा संवाद कोणाकोणामध्ये झाला ?
३) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ? का ?
४) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होता? (५) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे? ६) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? (७) प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल?
+ सक्षम बनू या
कृती-२ शिक्षक वरील संवादाचे आवाजातील न उतार विरामचिन्हे आशय लक्षात घेऊन प्रकटवाचन करतात. शिक्षक संवादाचे वरील प्रश्न उत्तराद्वारे चर्चा करतात. संवाद वाचताना आशय, आवाजातील चढ उतार नवीन शब्द, पात्र, संवादाचे ठिकाण याकडे लक्ष द्यावे हे स्पष्ट करतात. वरीलप्रमाणे विविध प्रकारचे संवाद मुलांना वाचनास देतात.
भूती-२ शिक्षकांनी संवाद कसा लिहायचा याबाबतीत विद्यार्थ्यांना पुढील मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन करावे.
1) संवादात दोन किंवा अधिक व्यक्ती सामील असतात.
3) संवाद म्हणजे एखाद्या विषयावर एकमेकांशी बोलणे असते.
2) संवादातील बोलणाऱ्याच्या वाक्ये दुहेरी अवतरणचिन्हात लिहिली जातात.
4 ) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पात्रांची संख्या कमी असावी.
5) संवादासाठी एक निश्चित विषय निवडावा व त्यावर आधारित पात्रांचे बोलणे असावे,
(6) संवादात सलगता असावी.
7) वाक्ये जास्त मोठी नसावीत.
(B) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी वाक्यरचना मुदमुदीत असावी. योग्य ठिकाणी अवतरणचिन्हे वापरावीत.
शिक्षकांनी वरीलप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पुढील विषयाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना संवाद लिहायला सांगावा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :- उत्तरे सांगा.
1. तुम्ही ज्या कुटुंबात राहात आहात ती कुटुंब लहान आहे की मोठी कुटुंब आहे ?
2. तुमच्या घरात शेजारी कोणाचे घर आहे ?
3. तुम्हाला लहानपणी काही खेळ खेळायचे असेल तर तुम्ही कोणाबरोबर खेळता ?
माझी जाबाबदारी आणि संवेदनशीलता :- हा पाठ परिसर अभ्यास भाग- १ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १२०.१२१.१२२, १२३, १२४,१२५ वर दिलेला आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. आजी-आजोबांना कोणता विरंगुळा असतो ?
२. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?
उपक्रम