पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
• शिक्षक विद्यार्थ्यांना खालील उतारे वाचण्यासाठी देतात..
• विद्यार्थी समजून उतारा वाचतात का हे दिलेल्या बरोबर शीर्षकांवरून जाणूनघ्यावे.
शुक्रवारची दुपार होती. बाळूला भूक लागली होती. तो थकला होता. चालता चालता तो एका बागेजवळ पोहोचला. बाग फळांनी बहरलेली होती. बागेच्या प्रवेशद्वारावर त्याने पाटी पाहिली. त्यावर लिहिले होते. ‘ही बाग खाजगी मालकीची आहे. येथील फळे व भाज्या तोडण्यास मनाई आहे’ ही बाग दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती आहे त्यामुळे फळे तोडणे गैर आहे. असा क्षणभर विचार करून तो काही पावले पुढे गेला. थोड्या वेळात पपईने लगडलेल्या एका मोठ्या झाडाजवळ येऊन तो थांबला. त्याने भोवताली पाहिले. आजूबाजूला कोणीही नाही, अशी खात्री केली. त्याला राहवले नाही. त्याने एक मोठी पपई तोडली. आनंदाने पपई खात खात चालू लागला. आपण किती भाग्यवान आहोत असे त्याला वाटले. दोन तीन दिवसांनी त्याचे वडील त्याच्यावर एकदम रागावले आणि म्हणाले, तुझ्या आजोबांनी तुला शेजारच्या बागेतून पपई चोरताना पाहिले. हे मला समजले आहे म्हणून मी तुला शिक्षा करणार आहे. चोरी करणे चुकीचे आहे.
+ सक्षम बनू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील उतारा समजपूर्वक आकलनासह वाचण्यास सांगावा. वरील उताऱ्यावर आधारित आकलनावर प्रश्न विचारावेत.
नमुना प्रश्न :-
१) बागेच्या प्रवेशद्वारापाशी कोणती पाटी लावली होती?
२) बाळूने कोणते फळ खाल्ले
३)बागेत बाळू कोठे थांबला?
४) बाळूला भाग्यवान असल्यासारखे का वाटले?
५) बाळूचे वडील बाळूला का शिक्षा करणार होते?
६) उतान्याला योग्य शीर्षक द्यावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 24
समजून घेऊया: पदार्थ आणि वस्तू, ऊर्जा, ऊर्जेची रुपे
संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 24 (पदार्थ, वस्तु आणि ऊर्जा )
अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. (उदा. तक्के आरेखन / स्तंभालेख / पाय चार्ट) व कृती वा घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात. यावरून कारण व परिणाम यांतील परस्परसंबंध स्थापित करतात.
लक्षात घेऊया:
पदार्थ आणि वस्तु
वस्तूंना विशिष्ट आकार असतो. त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते. वस्तू पदार्थापासून बनलेल्या असतात.
ऊर्जा
विविध पदार्थांपासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो. पदार्थाचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थांपासून
ऊर्जा मिळते. काम म्हणजेच कार्य कार्य करण्याच्या क्षमतेला ‘ऊर्जा’ म्हणतात.. मोटारगाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता, म्हणजेच ऊर्जा मुक्त होते. अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात. कोळसा, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते.
धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते. गतिच्या स्वरूपातील
ऊर्जेला ‘गतिज ऊर्जा’ म्हणतात.
विषय – परिसर अभ्यास
अध्ययन अनुभव / कृती- इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास १. प्रकरण : ओळख भारताची
अधिक माहिती येथून मिळेल – https://diksha.gov.in/dial/55X11C
काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिही.
२. भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते?
३. भारतात प्रदेशांनुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते?
अधिक सराव करू
भारताच्या प्राकृतिक नकाशाच्या निरीक्षणातून भारताची जलप्रणाली जाणून घ्या. कोणती नदी कोणत्या राज्यातून वाहते याचा तक्ता बनवा (इयत्ता पाचवी, विषय : परिसर अभ्यास १. प्रकरण : ओळख भारताची, पान क्र.४५)