पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस एकविसावा| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या
1. शिक्षकांनी मुलांना परिसर, घर, शाळा इत्यादी ठिकाणी घडणारा घटनाक्रम देऊन
कृतीच्या पायऱ्या सांगण्यास सांगावे.
2. कृती सांगताना मुलांची भाषा, आत्मविश्वास, कृतीचा क्रम इत्यादीचे सहेतुक निरीक्षण
करावे.
3. घटनाक्रमः 1. पिक काढणे. 2. खेळ खेळणे 3. स्वयंपाक करणे 4. झाडांना पाणी देणे. 5. बसने प्रवास करणे 6. शाळेत हजर होणे. अशा स्वरूपाचे घटनाक्रम मुलांना द्यावेत. त्यामधील कृतीचा क्रम सांगण्यास प्रेरित करावे.
4. मुलांनी कृतीच्या पायऱ्या सांगताना त्यांची घरची भाषा बोलीभाषा स्वीकारावी.
4. सराव करु या
शाळेतील परिचित घटनाक्रम घेऊन कृती सांगा. 1. पाढे म्हणणे 2. वाचन करणे 3. मैदानावर खेळणे,
+ कल्पक होऊ या शाळेत येताना, जाताना किंवा अन्य कुठे तुम्ही पाहिलेल्या घटनेचा
घटनाक्रम आपल्या वहीत लिहा
विषय – गणित
तुला आता किती वाजले असतील, हा प्रश्न केव्हा केव्हा पडतो ? असा प्रश्न पडल्यानंतर तू काय करतो /
करते ?
घरातील तुझ्यापेक्षा जी वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडून घड्याळाचे वाचन कसे करावे हे समजून घे. वरील चित्रात १२ ताशी घड्याळ दाखवले आहे. यासारखे घड्याळ तू दररोज पहात असणार. या घड्याळात १ ते १२ वर्तुळाकारात क्रमाने अंक छापलेले आहेत, त्यामध्ये स्वतःच्या आसाभोवती फिरणारे तीन काटे आहेत, वरील चित्रात त्यांची नावे दिसत आहेत. घरी किंवा जवळपास असलेल्या घड्याळातील फिरणाऱ्या तिन्ही काट्यांचे बारकाईने कर. घड्याळ समजून घे वरील घड्याळात १० वाजले आहेत. घड्याळ वाचनाचा सराव कर.
सेकंद – मिनिट तास ही वेळ मोजण्याची एकके आहेत.
६० सेकंद = १ मिनिट;
६० मिनिट = १ तास;
२४ तास = १ दिवस.
• सराव कोपरा
• वेळ मोजण्याची एकके कोणकोणती आहेत ?
आईला सकाळचा स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद कर.
• दहा मिनिटात तू पुस्तकातील किती शब्द वाचू शकतो याची नोंद घे,
तू. सकाळी झोपेतून किती वाजता उठतो ?
तुझी शाळा किती वाजता भरते आणि किती वाजता सुटते ? याच्या नोंदी कर.
+खालील पाळांत दिसणारी वेळ तास व मिनिटांत लिहा.
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात –
१. पाणी कशातून पिता त्यांची यादी करा.
३. पाण्याच्या स्त्रोतांची सूची तयार करा.
२. जमिनीत पाणी कुठून येते ते शोधा
आवश्यक साहित्य – पाण्याच्या स्त्रोतांचे चित्र
अध्ययन अनुभव –
पाणी हे जीवन आहे त्यामुळे त्या पाण्याचा वापर आपण रोज करत असतो ती पाणी कुठून येतं हे आपल्या
सर्वांना माहिती आहे
१. पाणी काटकसरीने वापरा
२. नदीतील पाण्याची चव चाखा
३. आपण तुम्ही पाठवतो कुठले पाणी पिण्यासाठी वापरतो ते सांगा
४. पाणी गाळून घ्या
काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. पाणी नेमके कोठून येते ?
2. नदी कशी तयार होते ते सांगा?
3. पाणी कोणत्या दिशेने वाहते?
अधिक सराव करू – पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडव.