कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन’? एका शेतकऱ्याचा प्रेरणादायी संघर्ष
26 जानेवारी दोन हजार 2022 म्हणजेच आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली . हा पद्म पुरस्कार भारतातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो कृषी शिक्षण , आरोग्य अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे . या वर्षी कृषी क्षेत्रातील दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणारा कर्नाटक मधील अमई महालींगा नाईक या 72 वर्षीय शेतकऱ्याचा सुद्धा समावेश आहे .
काय केला आहे या शेतकऱ्यांने ज्यामुळे यांना पद्म पुरस्कार दिला जात आहे चला तर मग जाणून घेऊया .
अमई महालींगा नाईक Amai Mahalinga Naik हा 72 वर्षीय शेतकरी कर्नाटक मधील अद्यानाडकाजवळचं एका छोट्या खेडेगावांमध्ये राहत होता. तेथे अमई हे एका श्रीमंत शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असे.या शेतात नारळ आणि सुपारी हे पीक घेतले जात.अमई हे पूर्वी पासून प्रामाणिक इमानदार व काबाडकष्ट करणारे असे होते.
अमई यांचा प्रामाणिकपणा मेहनत पाहून त्यांचा मालक महाबाला यांनी अमई यांना डोंगरावर असणारी एक पडीक शेत जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन बक्षीस मिळाली खरी परंतु माळरानावर असल्यामुळे ती जमीन पडीक होती त्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता .
ज्या वेळेस आपली स्वप्न मोठी असतात त्यावेळेस अशक्य असे काहीच नसते असेच काहीसे घडले अमई या शेतकऱ्यांच्या बाबतीत यांनीदेखील याच डोंगराळ पडीक जमिनीमध्ये सुपारीच्या बागा लावण्याचे स्वप्न पाहिले. आणि येथूनच एका संघर्षाची सुरुवात झाली .
वर्ष होते 1978 अमई यांना बक्षीस म्हणून मिळालेली जमीन याचा आनंद तर झालाच परंतु त्याच्याच पुढे पाण्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर होता. इतर कोणी व्यक्ती जर समोर असता तर त्याने असे स्वप्न बघण्याचे धाडस देखील केले नसते . परंतु शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा असतो हे अमई यांनी सिद्ध करून दाखवायचे ठरवलेच होते जणू .
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे | या उक्तीप्रमाणे अमई यांनी अडचणींची पर्वा न करता आपले काम सुरू ठेवले . आपल्याला जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये काम करता यावे याकरिता त्यांनी त्याच माळरानावर एक छोटीशी झोपडी देखील बांधली .
डोंगरावरील जमीन सपाट करून घेतली. पावसाचे पाणी अडवण्यासाठी तर खोदायला सुरुवात केली . हे सर्व करत असताना मालकाच्या शेतात शेतमजूर म्हणून काम देखील सुरु होते .
दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचं आणि काम संपलं की चर खोदण्याचं काम करणं हे त्याचं रोज सुरु होतं. हे काम रोज रात्री ९ वाजेपर्यंत चालायचं. मग हा अवलिया जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे.
असं करत करत त्याने पहिला बोगदा २० मीटरपर्यंत खोदल्यानंतर कोसळला. तब्बल २ वर्षे खोदण्याचं काम करुनही त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही. त्यानंतर सलग सहा वर्षात असे ४ बोगदे कोसळल्यानंतरही त्याने माघार घेतली नाही. मग त्याच्या नंतरच्या बोगद्याने या अवलियापुढे हार मानली आणि तब्बल ३० फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परत ते पाणी शेतापर्यंत आणण्याचं आव्हान होतंच. मग त्याने एक शक्क लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करुन बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणलं आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.
सुमारे आठ वर्षातील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. या आठ वर्षात अमई यांना लोकांना नाव ठेवलं, पण त्याने या बोलण्याकडे लक्ष न देता काम केलं आणि त्याच्या ओसाड माळरानावर सोनं पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली.
त्यानंतर त्याने आपल्या शेतात सुपारी, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेलं पाणी शेतासाठी पुरेसे होत आहे. हाच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी म्हणजेच आजचा अमई महालिंगा नाईक !
याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज ३०० पेक्षा जास्त सुपारीची, ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, २०० केळीची आणि काही काळी मिरचीची झाडं आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय. म्हणून जगभर त्यांना ‘टनेल मॅन’ म्हणून ओळख निर्माण झालीय. नाईक यांनी आल्या जिद्दने शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचं वय ७२ वर्षे इतकं आहे. आजही नाईक स्वत: शेतातली सगळी कामं करतात. आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात हे विशेष.
याच त्यांच्या जिद्दीच्या मेहनतीच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजेच त्यांना मिळणारा पद्म पुरस्कार
शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेल आहे आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत.