इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 27
विषय – इतिहास – भूगोल

खालील माहिती वाचा व समजावून घ्या
अध्ययन अनुभव / कृती
नवाश्मयुगात कृषिप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली. कृषिप्रधान समाजव्यवस्थेचा परिणाम समाजातील सर्वच घटकावर कसा झाला ते पाहू. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात शिकार व फळे कंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न जास्त दिवस साठवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या जीवनपद्धतीत समूहातील सर्वच स्त्री मिळवण्याच्या कामात वाश्मयुगातील सुरु झाला व इतर वाढले. शेतीमुळे पिकलेले अन्नधान्य येणे शक्य झाले. ●भागूनही शिल्लक लागले. त्यामुळे पुरुषांना नवीन पुरुष फक्त अन्न सतत गुंतलेले असत. शेतीमध्ये प्राण्यांचा वापर कौशल्यामुळे शेतीचे उत्पादन मिळालेल्या स्थिरतेमुळे दीर्घ मुदतीसाठी साठवता समूहातील सर्वांची गरज उरेल इतके धान्य मिळू समूहातील काही स्त्री गोष्टींचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नयीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारे मणी बनवणारे यांसारखे कारागीर तयार झाले.

मातीचे भांडे हातांनी घडवणारी स्त्री
नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवल्या होत्या असे मानले जाते.
शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते व शेतीतही प्रगती होत होती. शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. कारागिरांनी काम केल्यावर मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. कारागिरही विविध वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चामालाची किंमत ही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाण-घेवाणीतूनच चुकवली जात असे. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. विनिमयात कामाच्या मोबदल्यात धान्य किंवा वस्तू दिली जाते. जेव्हा कच्चामाल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे, तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे.
मीठ ही अत्यावश्यक गोष्ट बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत असे कारण ते समुद्र किनारपट्टीवर तयार होई. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. गावागावातील व्यापाराची आणि साधन संपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे याचे नियम तयार झाले. त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांनाच गावाचे कर्तेपण मिळाले. म्हणजेच गावाचा कारभार पाहण्याचा अधिकार मिळाला. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तींवर सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली. नवाश्मयुगातील गावाच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतींचे आणि खंदक यांचे पुरावे मिळाले आहेत. पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या.
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
उत्तर : …………………………………………
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1 नवाश्मयुगात कोणते कारागीर तयार झाले? नवाश्मयुगात स्त्री-पुरुषांना वेळ कसा मिळू लागला?
2 विनिमयाची पद्धत कशी रूढ झाली?
3 नवाश्मयुगात शासनव्यवस्था कशी निर्माण झाली ?
I’m gone to tell my little brother, that he should also viit this website on regular basis to gett updated from most recent news. https://Bookofdead34.Wordpress.com/