इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 26
विषय – गणित

थोडं समजून घेऊ
विभाज्य
8 ने विभाज्य संख्या 8, 16, 24, 32, 40, 48, 56… 6 ने विभाज्य संख्या 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54… 8 व 6 ने सामाईक विभाज्य लिही. ने
लघुत्तम सामाईक (साधारण) विभाज्य: लसावि
दिलेल्या संख्यांचा लसावि काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यांतील लहानात लहान सामाईक विभाज्य संख्या शोधणे.
4 व 6 या संख्यांचा लसावि शोध.
4 ने विभाज्य संख्या 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40…
6 ने विभाज्य संख्या: 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54…
4 व 6 ने सामाईक विभाज्य 12, 24, 36.
4 व 6 ने विभाज्य संख्यांच्या यादया पाहिल्या तर असे दिसते, की 12 ही सर्वांत लहान सामाईक विभाज्य संख्या आहे म्हणून 4 व
6 चा लसावि 12 आहे.
चला सराव करूया
13 व 6 चा लसावि काढ.
13 ने विभाज्य संख्या: 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130…
6 ने विभाज्य संख्या : 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78, 84..
13 व 6 ने सामाईक विभाज्य : 78
13 ने व 6 ने विभाज्य संख्यां च्या यादया पाहिल्या तर असे दिसते, की 78 ही सर्वांत लहान सामाईक विभाज्य संख्या आहे म्हणून
13 व 6 चा लसावि 78 आहे.
सोडवून पाहू
प्रश्न. दिलेल्या संख्यांचा लसावि शोध.
(1) 8, 20
(2) 2, 3, 5
(3) 12, 28
(4) 15, 20
(5) 8, 11
(6) 9, 15
(7) 11, 22
(8) 15, 45