इ 3री आजचा सेतू अभ्यास दिवस 25
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


थोडी उजळणी
१) कविता जवळ २४ मणी होते आईने तिला अजून १७ मणी दिले तर तिच्या जवळ एकूण किती मणी झाले ?
२) गोठ्यात ३६ गाई होत्या अजून २८ गाई गोठ्यात आल्या तर आता किती गाई झाल्या ?
३) आजी जवळ ५५ रुपये होते, बाबांनी आजीला ३५ रुपये दिले तर आजी जवळ एकूण किती रुपये झाले ?
४) बसमध्ये ३८ पुरुष व २६ महिला बसल्या आहेत तर बसमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत आहेत ?
पुढील उदाहरणे सोडवा.
१. एका टोपलीत ४८ चाफ्याची फुले व २६ गुलाबाची फुले आहेत तर टोपलीतील एकूण फुले किती ?
२. शिवांशकडे ३८ चिंचोके आहेत त्याला सकीनाने १३ चिंचोके दिले तर शिवांशकडे एकूण किती चिंचोके झाले ?