इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 23
विषय – मराठी
खालील माहिती काळजीपूर्वक वाचा
जाणून घेऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी पुढील प्रकारे संवाद करावा.
आंबा
वाचा पाहू मी फळ्यावर कोणता शब्द लिहिला आहे.
कळला का अर्थ ?
‘आंबा लिहिलं आहे.’
पण आंब्याचे काय?
विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यावे. उदा. मला आंबा आवडतो.
मी आंबा खातो.
मी आंबा खाते.
नुसत्या आंबा शब्दावरून आपल्याला काही कळत नाही . आंब्याचे आपण काय काय करतो ते सांगितलं की मात्र समजते. हे शब्द वाक्याला अर्थ प्राप्त करून देतात. हे शब्द काहीतरी कृती सांगणारे आहेत. यालाच क्रियापद म्हणतात.
- ते कोण ?
ते रुजते,उगवते/अंकुरते,पालवते, वाढते, तरारते, बहरते,मोहरते,फुलते,डोलते, हिंदोळते, सळसळते, झडते, वाळते, वठते.
2) तुझा दररोजचा दिनक्रम कसा आहे ते लिही.
कल्पक होऊ या
1) फळयावरील उताऱ्यात वाक्य पूर्ण करणारे एकही क्रियापद दिसत नाही. तुम्हाला योग्य वाटेल ती क्रियापदे योग्य त्या पद्धतीने वापरून हा उतारा पुन्हा लिहून काढा.
एक प्रसन्न संध्याकाळ. वातावरणात सनईचे सूर, मोग-याचा सुगंध आणि नव्या रेशमी वस्त्रांची ऐकू येणारी सळसळ. हलक्या आवाजातील कुजबुज आणि मध्येच कुणाचे तरी खळखळते. हास्य. माझ्यासमोरच्या वृद्ध आजोबांचे अर्धे लक्ष घड्याळाकडे आणि अर्धे आपल्या रांगणाऱ्या नातवाकडे. ‘कुणीतरी लवकर सोडवा मला यातून’, असा आजोबांच्या चेहऱ्यावर भाव.
2) पुढील प्रत्येक आद्यक्षरांपासून नाम, विशेषण, क्रियापद तयार करा आणि खालील दिलेल्या उदाहरणातील वाक्याप्रमाणे प्रत्येक आद्याक्षरांपासून बाक्य तयार करा.
त, म, ग, च, ट, ब, स, श
