इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 21

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  21

विषय  – इतिहास – भूगोल  

evs-2-setu-

करून पाहूयात

अशी कल्पना कर की, तु जंगलात आहे आणि तुला खूप तहान लागली आहे, तुझ्याकडे कोणतेही साधन नाही, तर स्वच्छ पाणी पिण्यासाठी काय करशील?

अध्ययन अनुभव / कृती –

तुला घरी नारळ सोलायला सांगितले व नारळ सोलण्यासाठी सुई, दाभण व स्क्रू डाईव्हर (पेचकस) या तीन वस्तू दिल्या तर तू नारळ सोलण्यासाठी तीनपैकी कोणते साधन वापरशील? साधनाचे नाव व ते साधन का वापरणार ते लिही.

………………………………………………………………………………………………………………..

………………………………………………………………………………………………………………..

………………………………………………………………………………………………………………..

खालील माहितीचा अभ्यास करा 

१.साधनांची उपलब्धता 

२. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर

३. अधिकाधिक परिणामकारकता 

४. साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड तासल्यास कामे अधिक चांगली होतात व वस्तूंना हवा तसा आकार देता येतो, हे मानवाच्या लक्षात आले. मानवाने फक्त दगडच नव्हे तर हाडे, काठ्या, काटक्या वापरूनही हत्यारे बनवली. परंतु हाडे, काठ्या, काटक्या हे नाशवंत असल्यामुळे त्यापासून बनवलेली हत्यारे सहसा मिळत नाहीत.

अश्म या शब्दाचा अर्थ दगड असा होतो. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला अश्मयुग असे म्हटले होते. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पडतात. 

१. पुराश्मयुग २. मध्याश्मयुग ३. नवाश्मयुग

पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्र वापरून हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे यालाच आघात तंत्र असे म्हणतात.

आघात तंत्राच्या पद्धतीने तयार केलेली सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी आधार असे. अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात. त्यांचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते, हे त्याच्या हत्यारांवरून समजते. ही हत्यारे तयार करत असताना दगडाचे धारधार छिलके निघत असत. तो ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरखडणे, मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामांसाठी करत असे.

      ताठ कण्याच्या मानवाने बनवलेली हातकुहाड आणि फरशी ही हत्यारे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणबद्ध होती. कोणतेही प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते. ताठ कण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा, हे मनामध्ये ठरवत होता. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्यांनी सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घाण वापरला. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्या अधिक पातळ धारेच्या खरखडण्या, तासण्या बनवल्या. म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे वापरत होता. सुधारलेल्या हत्यारांमुळे ताठ कण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली. कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले.

     बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडांपासून लांब, • पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तीदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूप प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाली. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. काही सामूहिक उत्सवही साजरे करू लागला होता. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्रे यांचा या उत्सवांची संबंध असावा असे मानले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हांडे, प्राण्यांचे दात इत्यादी पासून तयार केलेली मणी बुद्धिमान मानवाने दागिने म्हणून वापरायला केली.

     मध्याश्मयुगामध्ये मानवाने कुत्रा माणसाळवला. हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवनपद्धती बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरीत्या उगवलेल्या धान्याची कापणी ही करू लागले होते. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होते. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता. या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळवण्यासाठी सुरुवात झाली. या सगळ्यांचा विचार करता बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखाएवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे. अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यांसारखी अवजारे बनवत असे.

नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेले या दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले गेले. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि ..पशुपालन करणे त्यांची जीवनपद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालना पूरक साधन बनले.

काय समजले ?

वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१.साधनांची निवड कशावर अवलंबून असते?

२.आघात तंत्र कशाला म्हणतात?

३.ताठ कण्याचा मानव हत्यारे कशी तयार करत? 

४.प्रगत मानवी संस्कृतीची वाटचाल कशी सुरु झाली?

5.नवाश्मयुग कोणत्या काळास म्हणतात?


1 thought on “इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 21”

Leave a comment