इ 6वी सेतू अभ्यास दिवस 21

इ  6वी  सेतू  अभ्यास दिवस  21  

विषय  – गणित 

1. खालील उदाहरणे सोडवा. भागाकार व बाकी लिहा,

(1) 1284 ÷ 32

(2) 5586 ÷ 87

(3) 1207 ÷ 27

(4) 8543  ÷ 41

5) 2304 ÷ 43

(6) 56,741 ÷ 26

2. ताशी 48 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? 

3. गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली. प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे. तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली ? 

4. सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2925 रुपये जमले तर किती जणांनी वर्गणी दिली ?.

5. कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो

खालील उदाहरणे सोडवा

1. आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली. अलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे सहा विद्याथ्र्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल ?

2. सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली. त्यांपैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला, तर किती रुपये शिल्लक राहिले ?

3. एका दुकानदाराने साखरेचे 50 किग्रॅ वजनाचे पोते 1750 रुपयांस आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किग्रॅ 32 रुपये दराने विकावी लागली, तर त्याला किती रुपये कमी मिळाले ?

4. दुकानदाराने 1870 रुपयांस एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर 14,230 रुपयांस विकले, तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले ?

5. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला, तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला ?


Leave a comment