xiaomi mi tv: शाओमीचा नवा स्मार्ट TV, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी – xiaomi mi tv pro e32s with bezel-less design, 32-inch full-hd screen launched

[ad_1]

नवी दिल्लीः शाओमीने याआधी ४३ इंचाचा Mi TV E43K लाँच केला होता. कंपनीने आता ३२ इंचाचा Mi TV Pro लाँच केला आहे. शाओमीच्या ३२ इंचाच्या टीव्हीचा E32S चा मॉडल नंबर L32M6-ES आहे. शाओमीचा नवीन मॉडेल Mi TV Pro सीरिज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. या टीव्हीत बेजल लेस फुल स्क्रीन डिझाईन सोबत लाँच करण्यात आला आहे. शाओमीचा ३२ इंचाचा टीव्ही इतर टीव्हीच्या तुलनेत स्वस्त आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या या टीव्हीची किंमत ८९९ चिनी युआन म्हणजे भारतात ९ हजार ५०० रुपये किंमत आहे. शाओमीचा हा टीव्ही १० हजार रुपयांपेक्षा स्वस्त आहे.


वाचाःगुगल प्ले स्टोरवर मिळाला धोकादायक अॅप, एक चूक आणि बँक अकाउंट रिकामे

व्हाईस कंट्रोलला सपोर्ट करतो शाओमीचा हा टीव्ही
शाओमीचा ३२ इंचाचा Mi TV Pro टीव्हीत ३२ इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. युजर्संना यात व्ह्यूंईग एक्सपिरियन्स देतो. शाओमीच्या या टेलिव्हिजनमध्ये ६० एचझेड रिफ्रेश रेटसोबत १०८० पिक्सलचा रिझॉल्यूशन दिला आहे. या टीव्हीच्या स्क्रीनमध्ये अल्ट्रा हाय स्क्रीन टू बॉडी रेशियो देण्यात आला आहे. शाओमीचा हा टीव्ही बिल्ट इन XiaoAI व्हाईस असिस्टेंट सोबत येतो. यात १२ की ब्लूटूथ रिमोट कंट्रोल देण्यात आला आहे. जो व्हाईस कंट्रोल सपोर्ट करतो.

वाचाः
BSNL च्या या प्लानमध्ये ६०० दिवसांपर्यंत फ्री कॉलिंग, सर्वात मोठी वैधतेचा प्लान


टीव्हीत ८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले

शाओमीच्या या ३२ इंचाच्या टीव्हीत क्वॉड – कोर सीपीयू देण्यात आला आहे. शाओमीच्या या नवीन स्मार्ट टीव्हीत १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. शाओमीच्या ३२ इंच टीव्हीत 6W चे दोन स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच टीव्हीत ब्लूटूथ ४.० २.४ GHz WiFi, पैचवॉल आणि DTS डिकोडर दिला आहे. इंटरफेससाठी शाओमीच्या या टेलिव्हिजनमध्ये यूएसबी पोर्ट, 2 HDMI पोर्ट्स, एक AV इनपूट आणि एक अँटिना पोर्ट दिला आहे. या टीव्हीला भिंतीला लावू शकता किंवा स्टँडवर ठेवू शकता. या टीव्हीला दुसऱ्या मार्केटमध्ये कधीपर्यंत लाँच करणार आहे, हे शाओमीने सांगितले नाही.

वाचाः WhatsApp चे खास आणि सीक्रेट फीचर, आताच ट्राय करा

वाचाः वनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारण

[ad_2]

Source link

Leave a comment