[ad_1]
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. याला आठवडा होत नाही तोवर लोकांचा स्क्रीन टाइम वाढत असल्याचं समोर आलं. याचबरोबर सोशल मीडियाचा वावरही वाढलाय. आठवडाभरात सोशल मीडियावरील वावर तब्बल ८७ टक्क्यांनी वाढला आहे. लॉकडाउनच्या आधी एक व्यक्ती आठवड्याला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती तोच वेळ आता आठवड्याला २८० मिनिटं इतका झालाय. म्हणजे दिवसाला तब्बल चार तास लोक सोशल मीडियावर वावरू लागले आहेत. तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेळ घालवणाऱ्यांचं प्रमाण तब्बल ७१ टक्यांनी वाढल्याचं समोर आलं आहे. या सर्वामुळे डेटा वापरातही तब्बल ३० टक्के वाढ झालीय. परिणामी, अनेकांचा स्क्रीन अॅडिक्शनसारखं जाणवू लागलेलं आहे. यात टीनएजर्सची संख्या सर्वाधिक आहे. पण, हा लॉकडाउन काही काळापुरताच मर्यादित आहे. जेव्हा तो संपेल आणि सर्वजण नियमित कामाला सुरुवात करतील तेव्हा स्क्रीन टाइम कमी करणं त्रासदायक ठरणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या स्क्रीनमध्ये रमल्यामुळे अनेक तरुणांचं मानसिक संतुलन बिघडण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. परिणामी, घरात भांडणंही होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आपण आत्ताच स्क्रीन टाइमला लगाम लावणं आवश्यक आहे. हे कसं करता येईल याचे टेक्नॉलॉजीनं दिलेले पर्याय पुढीलप्रमाणे…
वाचाः …तर देशभरात स्वस्तात मिळणार करोना व्हायरसचे औषध
डिजिटल वेलबिइंग
आपल्या स्क्रीन टाइमची काळजी घेण्यासाठी सर्वांचा मित्र आणि लोकप्रिय सेवा गुगलनेच सर्वाधिक काळजी घेतली आहे. गुगल पिक्सल फोन, अॅड्रॉइड वन डिव्हासमध्ये अर्थात ज्यांच्याकडे अॅड्रॉइडचे ९ पाय आणि त्यापेक्षा अपडेटेड व्हर्जन असेल तर तुम्ही ‘डिजिटल वेलबिइंग’ अॅप डाऊनलोड करू शकतात. सेटिंगमध्ये हा पर्याय असतो. हे अॅप फोनच्या सेटिंग्जमध्ये दिसतं. तुम्ही किती वेळ स्क्रीनवर असता, कोणतं अॅप किती वेळ वापरता इथपासून सर्व तपशील अॅपमध्ये नोंदवला जातो. यामुळे तुम्ही कोणत्या अॅपवर अनावश्यक वेळ वाया घालवत आहात हे ठरवता येऊ शकतं. यात असे काही टूल्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही एखादं अॅप अमुक एक वेळ वापरल्यावर ते अॅप आपोआप बंद होतं. उदाहणार्थ, दिवसाला युट्यूबचा वापर ३० मिनिटं करायचा या अनुषगानं सेटिंग केली तर ३० मिनिटं वापर झाल्यावर अॅप सुरू होणार नाही. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्ही प्रत्येक अॅपनुसार वेळ निश्चित करून ठेवू शकता.
वाचाः व्हॉट्सअॅपवर मिळणार फेसबुकचे नवे फीचर
फोकस मोड
अँड्रॉइड १० मध्ये बिल्ट इन फोकस मोड आला आहे. यामध्ये अॅप ब्लॉकिंग फिचर आहे. यात तुम्ही डिस्ट्रॅक्टिंग अॅप्स एकत्र सिलेक्ट करून फोकस मोड सुरू करू शकता. एकाच वेळी अनेक अॅप्स ब्लॉक करण्याची सोय यामध्ये आहे. पण यात ठरावीक वेळेत अॅप वापरण्याचं सेटिंग करता येत नाही. यासाठी तुम्ही थर्डपार्टी अॅप डाऊनलोड करू शकता. हा फोकस मोड सेटिंग्जमध्ये डिजिटल वेलबिइंगमध्ये उपलब्ध आहे.
वाचाःशाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा Mi 10 5G लाँच, पाहा किंमत
स्टे फोकस्ड
हे स्क्रीन टाइम मॅनेजमेंट अॅप आहे. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाइल कसा वापरू शकता याचं व्यवस्थापन करता येऊ शकत. यात दिवसाला आपण किती वेळ कोणत्या अॅपवर घालवला हे समजू शकतं. यात तुम्ही अॅपचा वापर ब्लॉक करू शकता. याचबरोबर ठरावीक वेळही तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुम्ही तेवढा वेळ वापरलं की ते अॅप सुरूच होऊ शकत नाही. जर तुम्हाला अतिरिक्त वापर करायचा असेल तर ‘क्लिक टू ग्रँट’ करू शकता. यात स्पेसिफिक टाइम इंटर्व्हल्स, दिवसानिहाय व्यवस्थापनाची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजे एखादं अॅप सोमवार ते शुक्रवार अर्धा तास आणि शनिवार, रविवार जास्त वेळ वापरायचं असेल तर तशी सेटिंगही तुम्ही यात करू शकता. यात पेरेंटल मोड असून पालक आपल्या पाल्याच्या मोबाइलचं नियंत्रण घेऊ शकतात.
वाचाःजिओ पुन्हा नंबर वन, एअरटेल-व्होडाफोनला टाकले मागे
अॅक्शन डॅश
अॅक्शन डॅश हे अॅप एका क्लिकवर सर्व डेटा दाखवू शकतो. हे अॅप गुगल डिजिटल वेलबिइंगला उत्तम पर्याय आहे. यात अॅक्शन लाँचरचा पर्याय आहे. यात तुम्हाला क्लिनरपासून अनेक डिजिटल वेलबिइंगचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. याच्या अतिरिक्त सेवा हव्या असतील तर त्यासाठी ‘प्लस’चा पर्याय निवडून तुम्ही पैसे भरून अधिक सुविधांचा लाभ घेऊ शकता. यातही अॅपच्या वेळा निश्चित करण्यापासून, फोकस मोडसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
वाचाःलॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच
वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?
वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी
[ad_2]
Source link