best feature phone : भारतातील बेस्ट फीचर फोन, दमदार बॅटरीसह टॉर्च – best feature phone in india 2020 know price and specifications

[ad_1]

नवी दिल्लीः आज सर्रासपणे स्मार्टफोनचा वापर करण्यात येतो. यात लेटेस्ट फीचर्स मिळतात. तर दुसरीकडे टेक कंपन्या स्मार्टफोनसह फीचर फोन सुद्धा लाँच करीत असतात. अनेकांच्या हातात स्मार्टफोन असला तरी फीचर्स फोन अद्याप अनेक जण वापरत आहेत. जे लोक फीचर्स फोन वापरतात त्यांच्यासाठी खास निवडक फीचर फोनची यादी या ठिकाणी पाहू शकता. या फीचर फोनमध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि टॉर्चचा सपोर्ट मिळतो.

वाचाः
आयफोन १२ ची किंमत iPhone 11 पेक्षा कमी

InFocus Hero Play M1

या फोनमध्ये ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये १.८ इंचाचा डिस्प्ले आणि १ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये १८०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन ४ जी फोन नाही. या फोनची किंमत ९५० रुपये आहे.

वाचाः
मस्तच! जिओकडून युजर्संना २ जीबी डेटा फ्री

Karbonn K2 Boom Box

या फोनमध्ये ३२ एमबी स्टोरेज दिला आहे. हे ८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकता येते. यात १.८ इंचाचा डिस्प्ले, ड्युअल सिम सपोर्ट, ०.३ चा रियर कॅमेरा आणि १००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. यात रेडियो सुद्धा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ६९८ रुपये आहे.

वाचाः
‘वनप्लस ८’ सीरिजची भारतात प्री बुकिंग सुरू

Detel D4 Prime

या फोनमध्ये १.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. १६ जीबी पर्यंत या फोनचा स्टोरेज वाढवता येऊ शकतो. ड्युअल सिम सपोर्ट, ६५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनची वॉरंटी १ वर्षाची दिली आहे. या फोनची किंमत ७०० रुपये आहे.

वाचाः
शाओमीचा Mi10 यूथ एडिशन लाँच, पाहा किंमत

Micromax X516

या फोनमध्ये अँटी थेफ्ट, डिजिटल कॅमेरा, टॉर्च आणि ड्युअल सिम यासारखी फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनमध्ये १७५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ८७९ रुपये आहे.

वाचाः
मोबाइल विकताना तुम्ही पण ‘या’ चुका करतात?

नोटः फीचर फोनची यादी ई-कॉमर्स साईटवरून मिळालेल्या माहितीनुसार आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment