फेसबुकवरुन आता एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल

लॉकडाउन दरम्यान तगडी स्पर्धा देणाऱ्या झूम अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवीन फीचर लाँच केले आहे.  Facebook Messenger Rooms

सोशल मीडियीत अग्रेसर असलेल्या फेसबुकने ‘मेसेंजर रुम्स’ (Facebook Messenger Rooms) हे नवीन व्हिडिओ चॅटिंग फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे.

       या फिचरद्वारे ५० जणांना एकाचवेळी व्हिडिओ कॉल करता येणार आहे.


युजर्स या फीचरद्वारे स्वतः चॅट रूम्स तयार करु शकणार आहेत. फेसबुक मेसेंजरमध्येच ‘मेसेंजर रुम्स’ हे फीचर क्रिएट करण्यात आले आहे.

युजर्सना फेसबुकच्या मेसेंजरमध्येच ‘मेसेंजर रुम्स’हे फीचर मिळेल.

मेसेंजरद्वारे या फीचरमुळे एकाचवेळी ५० जणांना व्हिडिओ कॉल करता येईल.
विशेष म्हणजे ज्यांचे फेसबुक अकाउंट नसेल असे युजरही व्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Facebook Messenger Rooms वैशिष्ट्ये :-

  • युझरची चॅट रुम किती वेळ सुरू असेल यावर कोणतेही निर्बंध नसतील.
  • सर्व कंट्रोल्स मेसेंजर रुम होस्ट करणाऱ्याकडे असतील आ
  • रुम होस्ट करणारा आवश्यकतेनुसार युजर रूम लॉक किंवा अनलॉक करु शकेल.
  • रुम तयार करणाऱ्या युजरकडे कोणाला जॉइन करुन घ्यायचे हा पर्याय असेल.
  • कोणत्याही सभासदाला रुममधून काढून टाकण्याचाही पर्याय होस्ट युजरकडे असेल.
  • फेसबुक मेसेंजरवर ज्याप्रमाणे ग्रुप बनवला जातो, त्याचप्रमाणे मेसेंजर रुम्स क्रिएट करता येईल.  

आपणास हे देखील आवडेल –

कोरोनाशी लढताना डॉक्टरांचे रक्षण करणाऱ्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!

         कालपासून कंपनीने मेसेंजर रुम्स हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. हे फीचर आगामी काही दिवसांमध्ये सर्व युजर्सना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Leave a comment