TikTok : टिकटॉकवरील करोना उपाय आला अंगलट, १० जण पडले आजारी – chitoor two family admitted in hospital after watching wrong cure video of coronavirus on tiktok

[ad_1]

नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसमुळे सर्वत्र भीती पसरली आहे. करोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, डॉक्टर, नर्स, पोलिस, प्रशासन, सफाई कर्मचारी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परंतु, काही उठाठेव करणाऱ्या काही जणांकडून खबरदारी घेण्याऐवजी सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या शेअर केल्या जात आहेत. लोकांना करोना संदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे उघडकीस आली आहे.

वाचाः करोनाः भारतानं चीनकडून घेतला ‘हा’ धडा

चित्तूरमधील अलापल्ली गावात राहणाऱ्या दोन कुटुंबीयांनी गेल्या मंगळवारी टिकटॉकवर एक व्हिडिओ पाहिला होता. यात दावा करण्यात आला होता की, उम्मेठा काया (एक प्रकारचे फळ) खाल्ल्यास करोनाची बाधा होत नाही. त्यानंतर या दोन्ही कुटुंबांनी घरीच औषध बनवून ते खाल्ले. असे करणे त्यांच्या अंगलट आहे. हे खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात १० जणांची प्रकृती बिघडली. या दोन्ही कुटुंबातील १० जण आजारी पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या, चुकीचे व्हिडिओ जाणीवपूर्वक काही व्यक्तींकडून शेअर केले जात आहे. लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. करोनापासून कशी सुटका होईल, यासंबंधीची माहिती सरकार स्तरांवर दिली जात आहे. सरकारी अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत शक्य ती माहिती पोहोचवली जात आहे.

वाचाः लॉकडाऊनः मोबाइल अॅप्सवर युजर्संचे १७८१ अब्ज खर्च

उम्मेठा काया हे धतुरेच्या झाडाला येणारे फळ असते. हे फळ खाणे जीवघेणे ठरू शकते. टिकटॉक व्हिडिओत सांगितले होते की, हे फळ खाल्ल्यास करोना व्हायरस संपूर्णपणे बरा होता. तसेच करोनाची लागण होत नाही. पोलिसांनी आता हा व्हिडिओ बनवणाऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या दोन्ही कुटुंबांनी करोना व्हायरसची चिंता सतावत होती. करोना होणार तर नाही, ना या भीतीपोटी या कुटुंबाने हे फळ खाल्ले, असे पोलिसांनी सांगितले. वेळीच या कुटुंबांना उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. त्यामुळे लोकांनी पटकन विश्वास ठेवू नये, काही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वाचाः
सॅमसंगच्या या स्मार्टफोनची किंमत ३० लाख रुपये



[ad_2]

Source link

Leave a comment