कोरोनाशी लढताना डॉक्टरांचे रक्षण करणाऱ्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!


करोना ने फक्त भारतातच नव्हे तर कित्येक देशांमध्ये नुसतं थैमान घातलं आहे, भारतात लॉकडाउन पर्याय स्वीकारला आहे .! आणि दिवसेंदिवस ही परिस्थिति आणखीनच भीषण होताना दिसत आहे!

   दररोज आपल्या इथे एक ना दोन नवीन केसेस ऐकायला मिळतातच आहेत! यावरून आपल्याला लक्षात येईल की हा विषाणू किती जलद गतीने पसरत आहे.

 सध्या आपण करोना आणि त्याविषयीच्या बातम्या टेलिव्हिजनवर पहात आहोत. टीव्हीवरील बातम्या पाहत असताना आपल्याला त्यामध्ये या  करोना या विषाणू शी लढताना अनेक डॉक्टर्स नर्सेस दिसत असतील . 

  आपण जे नियमित डॉक्टर पाहतो त्यांचा पोशाख आणि या करोना व्हायरस अशी लढणाऱ्या डॉक्टरांचा पोशाख यामध्ये आपल्याला निश्चितच फरक जाणवला असेल 

आपण पाहिले असेल की ह्या डॉक्टर्सनी एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस परिधान केलेला असतो, त्यामध्ये पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत त्यांचं शरीर झाकलेलं असतं.

corona virus doctor suite

पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे हे ड्रेस असतात. त्यांना पाहिल्यावर बऱ्याच जणांना अंतराळवीरांची ही आठवण आली असेल कारण त्यांचाही एक विशिष्ट पोशाख ठरलेला असतो.

काय कारण असेल की डॉक्टरांना अशा प्रकारचा पोशाख परिधान करावा लागला असेल चला तर मग जाणून घेऊया त्या मागची कारणे आणि  कसा काय हा पोशाख डॉक्टरांना करोना सारख्या भीषण व्हायरसपासून संरक्षण देत आहे. 


 डॉक्टरांचा असा पोशाख असण्यामागे काय कारण असेल? एक तर करोना किंवा COVID 19 हा संसर्गजन्य आजार आहे.

या आजारामुळे डॉक्टरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांच्याही जिवाला धोका निर्माण होतो.

अगदी कोरोनाच्या या व्हायरसचा धोका ज्या डॉक्टर ली वेनलीयांगनी ओळखला त्यांना देखील कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यूदेखील झाला आहे .


हा जो ड्रेस सध्या डॉक्टरांच्या अंगावर दिसतोय तो २०१४ साली आलेल्या इबोला व्हायरसच्या रुग्णांवरती इलाज करताना डॉक्टरांनी पहिल्यांदा वापरला.

ebola-suit-sandeepwaghmore.in

म्हणून डॉक्टरांच्या संरक्षणासाठी हा सूट तयार करण्यात आला. या ड्रेसला म्हणतात हजमॅट (hazmat) सूट.

हा हजमॅट सूट हा डॉक्टरांना पूर्ण झाकून टाकतो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियल मध्ये प्लास्टिक, रबर, फॅब्रिक यांचा समावेश असतो. हे सूट वॉटर प्रूफ असतात.


तसेच यामुळे विविध प्रकारची केमिकल्स किंवा जैविक गोष्टी यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट डॉक्टरांच्या शरीराशी होण्यापासून प्रतिबंध होतो.

त्यामुळे एखाद्या व्हायरसचं संक्रमण डॉक्टरांमध्ये होण्यापासून बचाव होतो. डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी हा सूट घालतात.

यात गॉगल्स, ग्लोव्हज आणि गाऊन देखील उपलब्ध आहेत. अगदी चष्मा असेल तरी चष्म्यावरुनही हा गॉगल घालता येतो.

हा हजमॅट सुट कसा आणि केव्हा घालायचा याचे काही प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. वेगवेगळे हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर्स, ते ठरवतात. प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळं असू शकतं.

हे सूट अशाच पद्धतीने शिवलेले असतात की त्यामुळे घालणाऱ्याच्या शरीराला, बाहेरील कुठल्याही वस्तूचा स्पर्श होऊ नये.


अमेरिकेत तर एबोला पेशंट वर उपचार करणाऱ्या संपूर्ण मेडिकल स्टाफने देखील हा सूट घातलेला असला पाहिजे असा नियम होता.

त्यात गाऊन, मास्क, गॉगल याबरोबरच चेहरा देखील पूर्ण झाकलेला असतो. अमेरिकेत ह्या सुटचे चार स्तर आहेत. पेशंटची कंडीशन बघून कुठल्या लेव्हालचा सूट घालायचा हे ठरवलं जातं.

A,B,C,D असे त्या चार लेव्हल आहेत. पेशंटची प्रकृती जितकी गंभीर त्याप्रमाणे सूट घातला जातो.

hazmat-suit-level-sandeepwaghmore.in

A लेव्हल : अत्यंत धोकादायक पदार्थांना हाताळताना अशा प्रकारचे सूट घातले जातात. बाष्प, गॅस, धूळ यापासून घालणाऱ्या व्यक्तीचा बचाव होतो. ग्लोव्हज, बूट आणि सूट हे केमिकल प्रतिबंधक असतात.

चेहरा हा पूर्णपणे झाकलेला असतो. घालणाऱ्या व्यक्तीला श्वासोश्वास घेण्यासाठी एक उपकरण जोडलेले असते. या सुटला लाईफ सपोर्ट सिस्टीम असते.

त्यामध्ये एक कूलिंग फॅन देखील असतो. यात उच्च स्तराची सुरक्षा मिळते.

B लेव्हल : हे रसायन प्रतिबंधक सूट असून यात ग्लोव्हज आणि बूटस असतात. श्वास घेण्याचं उपकरण बाहेरच्या बाजूस असते, त्यामुळे विषारी वायूला यात A लेव्हल प्रमाणे प्रतिबंध होत नाही.

केवळ त्वचेच्या संपर्कापासून दूर राहण्यासाठी हा सूट जास्त वापरला जातो.


C लेव्हल : यात पोषाख आहे तसाच असतो फक्त श्वासोश्वासाठी वेगळे उपकरण जोडता येते ज्यामुळे शुद्ध हव सुट घालणाऱ्याला मिळते. पेशंटची स्वच्छता करताना हा सूट उपयोगी पडतो!

D लेव्हल : हे सूट केमिकल प्रतिबंधक नसतात मात्र संपूर्ण शरीर झाकलेले असते आणि पायामध्ये स्टीलचे बूट असतात तर चेहरादेखील पूर्णपणे झाकलेला असतो.


हे सूट व्यवस्थितरित्या घालण्यासाठी किमान अर्धा तास वेळ लागतो. हा सूट घालताना पहिल्यांदा हॅन्ड ग्लोव्हज, बूट, चेहरा झाकायचे हेल्मेट आधी घालावे लागतात.

शरीराचा कुठलाही भाग उघडा राहू नये याची काळजी घ्यावी लागते. अगदी सूट चढवल्यावर ही मनगट,कोपरे सांधे,या भागातील कापड घट्ट बांधून सुरक्षित केले जातात.

तो सूट काढतानाही काळजीपूर्वक काढावा लागतो. त्याचेही प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. ग्लोव्हज, बूट यांना बाहेरून हात लावायचा नाही. कारण त्या सगळ्यावर विषाणू येऊन बसलेले असू शकतात.

आणि डॉक्टर जेंव्हा पेशंटवर उपचार करतात तेंव्हा पेशंटच्या श्वासोश्वासाशी संबंध झालेला असतो.

प्रोटोकॉल असंही सांगतो की डोक्यापासून खाली पायापर्यंत त्याचक्रमाने तो सूट उतरवला पाहिजे. त्या सुटला नुसत्या हाताने स्पर्श करायचा नाही. आयसोलेशन एरिया मध्ये तो सूट काढला पाहिजे.

सूटचा प्रत्येक पार्ट काढताना मध्ये मध्ये हात धुतले पाहिजे. संपूर्ण सूट काढून झाल्यावर त्यानंतर डॉक्टरने लगेचच आंघोळ करणे गरजेचे असते.

hazmat-suit-removal-sandeepwaghmore.in

एकदा हा सूट वापरल्यावर परत दुसऱ्यांदा घालता येत नाही. एका वापरानंतर हा सूट नष्ट करावा लागतो.

 

ह्या सूटमुळे देवदूताप्रमाणे काम करणारे डॉक्टर्स नर्सेस, सगळे आरोग्य कर्मचारी यांचे रक्षण होते. आणि नवनवीन रुग्णांना इलाज करायची संधी मिळते.

आपणास हे देखील आवडेल

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter

Leave a comment