[ad_1]
या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः WHO, इंडिया डायरेक्टर सौरभ’चा मित्र सांगणारा हा व्यक्ती हा दावा करीत आहे. सौरभ म्हणतोय, देशात १५ एप्रिल ते १५ जून २०२० पर्यंत देशभरात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात येणार आहे. कारण WHO च्या माहितीनुसार, भारतात करोना व्हायरसची परिस्थिती खूप गंभीर आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेला दावा खरा मानला जात असून अनेक जण व्हॉट्सअॅप युजर्स याला मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.
An audio clip of a #FAKE phone conversation between two individuals discussing “complete lockdown” of the country i… https://t.co/gcb0Vq6Eeu
— PIB Fact Check (@PIBFactCheck) 1584699895000
टाइम्स फॅक्ट चेकच्या एका वाचकाने आमचा व्हॉट्सअॅप नंबरवर ही ऑडिओ क्लिप पाठवून या लॉकडाउनची खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.
खरं काय आहे?
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआयबी) फॅक्ट चेकने एक ट्विटच्या माध्यमातून या ऑ़डिओ क्लिपला खोटी आणि असामाजिक असल्याचे म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक च्या माहितीनुसार, दोन व्यक्तीची लॉकडाउनवर झालेली चर्चा खोटी आहे. खोटी माहितीचा ऑडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात येत आहे.
तसेच टाइम्स फॅक्ट चेकने World Health Organization ची वेबसाइट शोधली. भारताचे डायरेक्टर सौरभ यांच्या बाबतीत काहीच माहिती मिळाली नाही. परंतु, आम्हाला सौरभ नावाचा कोणताही व्यक्ती मिळाला नाही.
तसेच, प्रसार भारतीनेही आपल्या अधिकृत हँडलवरून या ऑडिओ क्लिपला डब्ल्यूएचओ शी चर्चा करताना हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. प्रसार भारतीने म्हटले की, भारतात या प्रकारचे असे कोणतेही पद नाही. ज्याचे नाव या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
#FakeNewsBusted An audio conversation mentioning WHO sending report to Indian govt regarding lockdown is doing roun… https://t.co/JYdnSJJOzO
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) 1584706118000
Fact Check : करोना व्हायरस संशयितांची चीनमध्ये धरपकड केली जातेय?, हा व्हिडिओ हाँगकाँगमधील आहे
[ad_2]
Source link