[ad_1]
करोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. त्यापार्श्वभूमीवर व्हॉटसअॅप आणि ई मेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सोय पोलिस विभागाने करून दिली आहे. जे नागरिक पोलिस ठाण्यात येऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या तक्रारी व्हॉटसअॅप व ई मेलद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलिस दलात मिळून एकूण सुमारे सात हजार कर्मचारी आहेत. करोनाच्या प्रादुर्भावमूळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पोलिस हे प्रशासनातील महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांना बंदोबस्तात इतर कामांमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरणे गरजेचे आहे. अशावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या नाकावर हात रुमाल किंव्हा मास्क लावावे, साबण किंवा सॅनिटायझरचा वापरकरून हात स्वच्छ धुवावेत आदी महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून पोलिस आयुक्तलायकडून मास्क देण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आव्हान करण्यात आले आहे. पैठण येथे नुकत्याच झालेल्या नाथषष्ठी यात्रेमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. तसेच करोनाच्या भीतीमुळे जे नागरिक पोलिस ठाण्यात येऊ शकत नाही त्यांनी व्हॉटसअॅप व ई मेलद्वारे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. त्यांची दखल घेतली जाईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
करोनामुळे देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही व्हॉटसअॅप व ई मेलद्वारेही तक्रारी स्वीकारणार आहोत. ज्यांना पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येणे शक्य नाही, त्यांनी या सुविधेचा आवश्य लाभ घ्यावा.
मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक, ग्रामीण
पुणेः करोनाचा धसका; ‘वर्क फ्रॉम होम’ला ग्रहण
रियलमीचा आजपासून सेल, फोन्सवर डिस्काउंट
[ad_2]
Source link