Lockdown म्हणजे नक्की काय ?

Lockdown


लॉक डाऊन म्हणजे काय? lockdown

करोना संसर्गजन्य आजार असल्यानं झपाट्यानं फैलावत आहे. या आजारात मृत्यूचा दर अत्यंत कमी असला तरी, पसरण्याचा दर खूप जास्त आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो.


त्यामुळे सरकारनं त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. विशेष म्हणजे स्पेन, इटली या देशांनी ‘लॉक डाऊन’चा पर्याय निवडला. त्यामुळे ‘लॉक डाऊन  lockdown म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न आता अनेकांना पडतो आहे.


lockdown ‘लॉक डाऊन’ झालं तर परिस्थिती कशी असणार?

दुर्मिळ वेळा ‘लॉक डाऊन’सारखा पर्याय स्वीकारला जातो. ‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. संभाव्य धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा निर्णय किती कालावधीसाठी ठेवायचा हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे. सध्या अशी तरी असा निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर हा लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो.

इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. वुहानमध्येही ‘कोरोना’चा उगम झाल्यानंतर परिस्थिती चिंताजनक झाल्यानं ‘लॉक डाऊन’ करण्यात आलं होतं.


lockdown लॉक डाऊन केल्यावर  काय होते?

  • लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही.
  • सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.
  • त्यामुळे केवळ आपत्तीजनक परिस्थिती असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही.
  • लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते.


असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

2 thoughts on “Lockdown म्हणजे नक्की काय ?”

Leave a comment