US health department : करोनाः अमेरिकेच्या आरोग्य विभागावर सायबर हल्ला – us health department hit by cyber attack amid coronavirus

[ad_1]

नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरसची भीती पसरली असताना सोमवारी अमेरिकेच्या आरोग्य विभागावर हॅकर्सने सायबर हल्ला केला. हॅकर्सने अमेरिकेच्या आरोग्य विभागाची साइट हॅक केली. इतकेच नव्हे तर या साइटवरून करोना व्हायरस संदर्भातील चुकीची माहिती, अफवा पसरवली. त्यामुळे अमेरिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. आता ही वेबसाइट आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सने करोना व्हायरसची अफवा पसरवण्यासाठी ही वेबसाइट हॅक केली. आरोग्य विभागाची साइट हॅक केल्याची माहिती समजताच आरोग्य विभागाने आणि अमेरिकन प्रशासनाना तातडीने पावले उचलली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने तात्काळ पावलं उचलली व ही साइट आपल्या ताब्यात घेतली. यानंतर एक ट्विट करून याची माहिती दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांना अशा वेळी संशय आला. ज्यावेळ करोना व्हायरसची बातमी चुकीच्या पद्धतीने वेबसाइटवर दिसली. त्यानंतर टीमने तत्काळ कारवाई करीत सर्व्हरला हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त केले.

हॅकर्सने आरोग्य विभागाची साइट हॅक करून नॅशनल लाकडाउनची अफवा पसरवली होती. परंतु, एनएससीने ट्विट करून ही चुकीची माहिती असल्याचे सांगितले. एनएससीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, राष्ट्रीय स्तरांवर करण्यात आलेली माहिती खोटी आहे. राष्ट्रीय लॉकडाउन करण्यात आलेले नाही. सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोलकडून करोना संदर्भात ताजे अपडेट देण्यात आले आहेत.

रियलमीचा उद्यापासून पुन्हा सेल, जबरदस्त ऑफर्स

रेडमी Note 7 pro चा बॅगेतच स्फोट

मस्तच! जीमेलचे मल्टीपल सिग्नेचर फीचर पाहिलेय?

दीड मिनिटात रेडमी नोट ९ प्रो ‘आउट ऑफ स्टॉक’



[ad_2]

Source link

Leave a comment