[ad_1]
या पॉवरबँकसोबत दोन डिव्हाइस देण्यात आले आहे. त्यामुळे यात दोन डिव्हाइस चार्ज करता येवू शकणार आहे. शाओमीच्या या पॉवरबँकला १२ लेयरची सिक्युरिटी दिली आहे. या पॉवरबँकचे वजन २३० ग्रॅम आहे. शाओमीने नुकताच भारतात रेडमी नोट ९ सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यात रेडमी ९ प्रो आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. रेडमी नोट ९ सीरिजची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. शाओमीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये शाओमीने लिहिले होते की, आता सांभाळून ठेवण्यासाठी वायरची गरज भासणार नाही. एमआय चाहत्यांसाठी आता वेळ आलीय की, #CutTheCord (वायरची गरज नाही) विना वायरचे उत्पादन सांभाळण्याची. शाओमीचा हा व्हिडिओ ६ सेकंदचा शॉर्ट आहे. या व्हिडिओत एक चार्जिंग सिम्बॉल आहे. ज्यात चारी बाजुनी एक वर्तूळ असून त्यात डॉट आहेत. ते चमकताना दिसत आहेत. त्यामुळे यावरून स्पष्ट होते हे उत्पादन चार्जिंगशी संबंधित आहे. शाओमीचे इंडिया अध्यक्ष मनू कुमार जैन यांनीही ट्विट केले आहे. शाओमीने याआधी एक वायरलेस फास्ट चार्जरचा एक टीझर जारी केला होता. तो ४० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा होता.
मोटोचा फोन भारतात लाँच; किंमत १२४९९९ ₹
करोनाः ‘या’ १४ वेबसाइट्स चुकूनही उघडू नका
[ad_2]
Source link