जे फेसबुकला सापडलं नाही ते एका पुणेकराने शोधलं, मिळालं 40 लाखांचं बक्षीस


फेसबुक आपल्या रोजच्या वापरातील एक महत्त्वाचं अॅप आहे. दरम्यान या फेसबुकमधील एक बग शोधून काढण्यात पुणेकर तरुणाला यश आहे. 10 वर्षांपूर्वीचा असणारा हा फेसबुक बग अर्थात फेसबुकमधील त्रुटी शोधून काढण्यात पुण्यातील अमोल बैकर यशस्वी झाला आहे. अमोलच्या या कामगिरीमुळे फेसबुककडून त्याला तब्बल 40 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे.


अमोल सिक्युरिटी रीसर्चर म्हणून काम पाहतो. त्याचप्रमाणे त्यांने कम्प्यूटर इंजिनीअरिंग डिप्लोमा केला आहे. वेगवेगळ्या वेबसाइट्सच्या डेव्हलपमेंट आणि सुरक्षा देखभालीचं तो काम पाहतो.


‘यापूर्वी फेसबुक आणि इतर अनेक वेबसाइट्समधील बग शोधले आहेत. यावेळी शोधलेला बग दहा वर्ष जुना होता. यूजरचा डेटा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा बग शोधू शकल्याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया अमोल बैकरने दिली आहे.


आज फेसबुकचा वापर करत नाही, असे अगदी बोटावर मोजण्या इतके लोकं सापडतील. या फेसबुकसह अन्य सोशल मीडिया साइट्समधील त्रुटी शोधणं हा अमोल बैकरचा व्यवसाय आहे. या छंद आणि व्यवसायामुळे अमोल आता लखपती बनला आहे. एखादी वेबसाइट वापरताना त्यावर लॉग इन (Log in) करणं बंधनकारक असतं. अशावेळी बऱ्याचदा फेसबुकमार्फत लॉग-इन (Log in with Facebook) चा पर्याय दिला जातो. यावेळी लॉग-इन करताना देण्यात येणाऱ्या परवानगीचा फ्लो हॅक करता येऊ शकतो, असं अमोलने फेसबुकच्या निदर्शनास आणून दिलं.


अमोलने फेसबुकला कळवताच त्यांनी ही त्रुटी दूर केली. ही सुविधा फेसबुकडून सुरक्षित करण्यात आली आहे. 10 वर्ष जुना हा बग शोधल्यामुळे फेसबुकडून ‘बग बाउंटी’ अंतर्गत अमोलला 55 हजार अमेरिकन डॉलर अर्थात 40 लाखांचं बक्षीस देण्यात आले आहे.

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment