[ad_1]
वॉरेन बफे हे आतापर्यंत दीड हजार रुपये किंमत असलेला सॅमसंगचा फ्लिप फोन वापरत होते. या फोनची किंमत केवळ दीड हजार रुपये आहे. बफे हे जो फोन वापरत आहेत. तो फीचर फोन सॅमसंगने २००९ ला लाँच केला होता. त्यावेळी त्या फोनचे मॉडेल Samsung SCH-U320 होते. परंतु, वॉरेन बफे यांनी आता आयफोन ११ वापरायला सुरुवात केली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली आहे. आयफोन ११ हा स्मार्टफोन मी सध्या वापरत आहे. पण, तो मी खरेदी केला नाही. तर मला तो फोन भेट म्हणून मिळाला आहे. या फोनचा वापर मी केवळ गेम खेळण्यासाठी तसेच सोशल मीडियासाठी करीत असल्याचेही बफे यांनी सांगितले.
बफे यांची संपत्ती ६.३१ लाख कोटी
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, वॉरेन बफे यांच्याकडे ८,७६० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ६.३१ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. बफे यांची कंपनी बर्कशायर हेथवेने नुकतीच डिसेंबरमध्ये २०१९ मधील तिमाहीत आकडेवारी प्रसिद्ध केले आहेत. यात त्यांच्या कंपनीला मोठा २९.२ अब्ज डॉलरचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांची कंपनी ही अमेरिकेतील सर्वात जास्त मार्केट व्हॅल्यू असलेल्या कंपनीपैकी एक आहे.
Airtel ने चार्ज वाढवला, टीव्ही युजर्संना दणका
युनिकोड म्हणजे काय?, माहीत आहे का?
रियलमीच्या ‘या’ ३ फोनवर २००० ₹ डिस्काउंट
[ad_2]
Source link