♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

गुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

  आज आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर आपण लगेचच मोबाईल हातात घेतो आणि ती गोष्ट मोबाईल मध्ये सर्च करण्याचा प्रयत्न करतो .  काही क्षणातच आपल्याला आपल्या सर्च केलेल्या गोष्टीबद्दल हजारो-लाखो पर्याय उपलब्ध होतात . ही सर्व किमया आहे गुगलची .

तसे पाहता google  एक वेबसाईटच आहे जी अन्य वेबसाईटवर असणारा डाटा किंवा माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम काही क्षणात करते .

मित्रांनो गुगल आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे यात कोणत्याही प्रकारची शंका तर नाहीच .  गुगल फक्त माहिती शोधून देणारा एक माध्यम नसून तो आपला मार्गदर्शन देखील आहे . 

       ज्याप्रमाणे आत्म्याविना शरीर निरुपयोगी तसेच काहीसे गुगल विना इंटरनेट आणि परिणामी आपले जीवन निरुपयोगी ठरेल  असे म्हटले तर त्यात कोणत्याही प्रकारचे गैर नसेल. 

        आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये गुगल एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे .  गुगल द्वारे मिळणाऱ्या माहितीवर आपण निश्चितच सर्वजण खात्री बाळगतो . कारण गुगलने सर्वांच्या मनामध्ये तशा प्रकारचे स्थान  विश्वास निर्माण केले आहे


आपण दररोज गुगलचा वापर करत असतो परंतु या गुगल विषयी आज मी तुम्हाला अशा रंजक गोष्टी सांगणार आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील आणि त्या तुम्हाला माहिती करून घ्यायला निश्चितच आवडेल. 

    चला तर मग जाणून घेऊया की जगाला सर्व माहिती देणारा गुगल अशा कोणत्या गोष्टी स्वतःजवळ ठेवून आहे की ज्या अतिशय रंजक   आहेत .


१), गुगल कंपनीची सुरुवात – 

लॅरी आणि सर्गी यांनी गुगलची स्थापना केली, पण तुम्हाला हे माहित नसेल की, ऑगस्ट १९९८ मध्ये सन मायक्रोसिस्टिम कंपनीचे सहसंस्थापक अँडी बॅचतोलशॅयम यांनी दोन्ही मित्रांना एक लाख डॉलर इतकी रक्कम दिली.त्यायोगे त्यांना गुगल कंपनी सुरू करता आली.


२) I feeling Lucky एका बटनासाठी करोडो रुपयांची रक्कम – 

गुगल सर्च बार च्या खाली आपल्याला बऱ्याच वेळा  I feeling Lucky हे बटन बघायला मिळते परंतु तुम्हाला माहिती आहे का की  I feeling Lucky हे बटण देण्यासाठी गुगलला दरवर्षी ६८२ कोटी इतकी रक्कम द्यावी लागते.  यात जाहिरात न पाहता युजरला थेट रिझल्ट मिळतो.


३) गुगल चे उद्दिष्ट –

गुगलने ई-मेलसोबत सोशल मीडियात जबरदस्त आघाडी मिळवली असून कंपनीने २०२० पर्यंत १२ कोटी ९० लाख पुस्तके स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


४. कठीण माेहीम सहजसोपी 

सौदी अरबच्या वाळवंटामध्ये स्ट्रीट व्ह्यूच्या शूटिंगसाठी गुगलने भाड्याने उंट घेऊन त्याच्या पाठीवर कॅमेरे बसवले होते. कठीण माेहीम सहजसोपी करण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली.

 


google des-sandeepwaghmore.in

६. गूगलचे नाव या अगोदर  हे होते – 

लॅरी आणि सर्गी यांनी १९९६ मध्ये इंटरनेटवर सर्च इंजिन तयार केले. याचे नाव आधी बॅकरब होते. १९९७ मध्ये कंपनीला गुगल डॉट कॉम डोमेन मिळाले.


google-first name

७. मृत कर्मचाऱ्यांच्या  नातेवाईकांसाठी विशेष सुविधा –

कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला पुढील १० वर्षे अर्धा पगार दिला जातो. त्याचबरोबर मुलांना एक हजार डॉलर इतकी रक्कम तो १९ वर्षांचा होईपर्यंत दिली जाते.


google-emploa

८. गुगलची कार्यालय तरी किती ? 

       गुगलचा तर फार मोठा असल्याने  व एखाद्या व्यक्तीने सर्च केलेली गोष्ट त्वरित मिळावी म्हणून    जवळपास सर्व देशांमध्ये गुगलचे एक कार्यालय आहे गुगल हे ४० पेक्षा जास्त देशांमध्ये ७० कार्यालये चालवते. 

 

९ )  दररोज कोट्यावधी सर्च  रिक्वेस्ट येतात गुगलला – 

दररोज १०० कोटीपेक्षा जास्त सर्च रिक्वेस्ट गुगलकडून हाताळल्या जातात. या जवळपास १० लाख संगणकामधून पाठवण्यात येतात. व इतर   सर्च रिक्वेस्ट मोबाईल मधून पाठवलेल्या असतात

१० ) एक  दशकापासून गुगलने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे – 

जून २००० मध्ये गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन बनले होते, जे ते अजूनही टिकून आहे.

 

११ )गुगल कडे आहे तुमचा सर्व डेटा – 

 तुम्हाला माहित आहे का ? की गुगलकडे ऑनलाइन असलेल्या व्यक्तीचे वर्तन विश्लेषण करण्याची आणि ते ट्रॅक करण्याची क्षमता आहे. तुम्ही कोणत्या साईट्सवर जात आहात आणि कोणत्या जाहिरातींवर क्लिक करत आहात, याबद्दलची माहिती गुगल त्यांच्या जाहिरातदारांना देते.


१२ )  आपल्या भाषेत शोधा गुगलवर – 

 ८८ भाषा गुगल होम पेजवर वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण कोणत्याही भाषेमध्ये गुगल वर विविध प्रकारची माहिती  शोधू शकतो


१३ ) YouTube गुगलचे प्रभावी माध्यम – 

    २००६ मध्ये गुगलने १.६५ बिलियन डॉलर्सला युट्यूबला विकत घेतले होते. युट्यूब आज जगतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय वेबसाईट आहे. युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला ३०० तासांपेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड होतात, असे गुगलच्या लक्षात आले आहे.


तर अशाप्रकारे  सर्वांना क्षणार्धात माहिती पुरवणारे , मार्ग दाखवणारे , व्हिडिओ टिटोरियल द्वारे  अनेक गोष्टी शिकवणारे अशा गूगल विषयी आजच्या आर्टिकल मध्ये आपण माहिती घेतली निषेधाची माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला सोबत ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांनादेखील याचा फायदा होईल .

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter