महाराष्ट्रात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ वर गेलीये. काल ५२ वर असलेला महाराष्ट्राचा आकडा ६३ वर गेलाय. अशात महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या आधीच महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद करण्यात आल्यात. पहिली ते आठवीच्या सर्व वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्यात. अशात महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत देखील अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
राज्यातील प्राप्त परिस्थिती पाहता सोमवारी होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीचा पेपर कधी घेतला जाईल याची घोषणा ३१ मार्च नंतर करण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.
महाराष्ट्रातील सर्व शाळांना बंद ठेवण्यात आलंय. अशात सातत्याने दहावीच्या परीक्षांबद्दल प्रचनचिन्ह उपस्थित केलं जात होतं. दहावीच्या परीक्षा पुढे का ढकलत नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. काल महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात येऊ शकतो असे संकेत दिले होते. अशात आज वर्षा गायकवाड यांनी दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केलीये.
उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter