वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी.
ज्या शिक्षकांनी वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे. अशा नोंदणी केलेल्या शिक्षकांचे नाव व त्यांची माहिती शाळेनिहाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला
1 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला जिल्हा निवडण्याचा ऑप्शन येईल.
2. जिल्हा निवडल्यानंतर आपण आपला तालुका निवडा
3 तालुका निवडल्यानंतर आपल्याला तालुक्यातील शाळांची यु-डायस सह लिस्ट समोर येईल.
4. यातून आपण आपल्या शाळेचा यु-डायस समोरील शो बटनावर क्लिक करा.
5 आपल्याला आपल्या शाळेतील वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षकांची यादी व सर्व माहिती दिसेल.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
निष्ठा प्रशिक्षण पूर्ण शेवटची संधी 1 ते 12 कोर्स पुन्हा एकदा सुरु
दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली होती .देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head’s and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे . सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश आहे.
nishtha
अनेक शिक्षकांना काही कारणास्तव यातील काही कोर्स पूर्ण करता आले नाही त्यांच्या सोयीकरिता कोर्स क्रमांक १ ते १२ पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांचे हे कोर्स राहिले असतील त्यांनी दिनांक 30 जून २०२२ पर्यंत आपले राहिलेले कोर्स पूर्ण करावेत या १ ते १२ कोर्सची लिंक ते खालील प्रमाणे आहे
विषय: विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत.
उपरोक्त विषयाबाबत मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांनी मा.मंत्री (ग्रामविकास) महोदयांना लिहिलेलं पत्र सोबत जोडले आहे. सदर पत्रावर मा.मंत्री (ग्रामविकास) महोदयांनी “तपासून सादर करावे असे निर्देश दिलेलं आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रिय स्तरावरील विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख हो पदे महत्वाची असून राज्यामध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदांची भरती करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार विचारणा होत असल्याचे प्रस्तुत पत्रात नमूद केले आहे.
प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की, या विभागाच्या दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाकरिता सरळसेवा निवडीद्वारे व पदोन्नतीद्वारे अनुक्रमे ५०:२५:२५ असं नेमणूकीचं प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. सरळसेवा भरतीसंदर्भाांत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या मर्यादेत सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदांकडील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदर पदं भरण्याबाबत दिनांक २० मे, २०२२ पर्यंत कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा.
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2022
केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने वरील (८) व (९) येथील अनुक्रमे दि. ०७ जुलै, २०१७ व दि. ०२ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि. ०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
शासन असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वाहतूक भत्त्याचे दर खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे सुधारण्यात यावेत.
शासन निर्णय क्रमांकः वाहम-२०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५
हे आदेश दि.०१.०४.२०२२ पासून अंमलात येतील.
उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.१३५० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.
तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे.
अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.५४०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.
२. या आदेशातील वाहतूक भत्त्याचे प्रदान खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन आणि त्यानुसार विनियमित करण्यात येईल.
एक) कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
दोन) ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
३. रजा, प्रशिक्षण, दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
४. शासन असेही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषि व कृषितर विद्यापीठांमधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदरहू आदेश लागू असतील.
५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.
६. शासन असेही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.
७. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यावरील खर्च त्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०४२०१२५५१०७२०५ असा आहे.
सदर आदेश पीडीएफ स्वरूपात
नियमित अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी
आकारिक मूल्यमापन करताना आपणास विद्यार्थ्यांच्या मध्ये आढळणारे आवश्यक सुधारणा या देखील प्रगती पुस्तकांमध्ये नोंदवावे लागतात . अशा 50 + आवश्यक सुधारणा वर्णनात्मकनोंदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .या बरोबरच या संकेतस्थळावर आकारिक मूल्यमापन नोंदी ,विद्यार्थ्यांचे आवड छंद नोंदी , विशेष प्रगती नोंदी तसेच आकारिक व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका इयत्ता निहाय उपलब्ध आहेत .
आपणास आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे आवड व छंद प्रगती पुस्तकांमध्ये नोंदवावे लागतात आवड छंद नोंदवण्यात करिता या ठिकाणी 60 ही पेक्षा अधिक आवड छंद वर्णनात्मक नोंदी नमुना म्हणून देण्यात आलेले आहे .असे त्या संकेतस्थळावर आपल्या आकारिक मूल्यमापनाची नोंदी प्रश्नपत्रिका , अडथळ्याच्या नोंदी वर्णनात्मक नोंदी , विशेष प्रगती नोंदी या उपलब्ध आहेत .
विशेष प्रगती नोंदी , vishesh pragati nondi ,व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी प्रगतीपुस्तकातील नोंदी आकारीक मूल्यमापन नोंदी
या ठिकाणी आपणास प्रगती पुस्तकात नोंदवण्यासाठी विशेष प्रगती नोंदीvishesh pragati nondi देण्यात आलेल्या आहेत. या विशेष प्रगती नोंदी नाच आपण व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी असे देखील म्हणतो . या ठिकाणी आपणास 100 पेक्षा जास्त विशेष प्रगती नोंदी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .या नोंदींचा वापर आपण नमुना नोंदी म्हणून करू शकता. तसेच या बरोबर या संकेत स्थळावर आपणास आकारिक मूल्यमापन करता आवश्यक असणाऱ्या वर्णनात्मक नोंदी अडथळ्याच्या नोंदी आवड छंद नोंदी,कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी अशा सर्व प्रकारच्या नोंदी उपलब्ध आहेत. तसेच आपल्या इयत्तानिहाय नोंदी उपलब्ध आहेत .
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता सहावी करता प्रवेश करिता जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा JNVST exam घेतली जाणार आहे या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे प्रवेश पत्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे . याठिकाणी आपण प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत How to download navodaya hall ticket download 2022
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी11.30 Am ते 1.30 Pm मध्ये होणार आहे . याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी .
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड | How to download navodaya hall ticket download 2022
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती ती आपल्या सोबत असू द्या.
1. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन नंबर (जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचा जो एप्लीकेशन फॉर्म जनरेट झाला असेल त्याच्यावर सुरुवातीला एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे . )
2. विद्यार्थ्यांची जन्मतारीख – (जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरताना जी जन्मतारीख आपण पण दिलेली आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी आवश्यक आहे.)
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची वेबसाईट
To download navodaya hall ticket 2022 website
या ठिकाणी खालील लिंक वर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या लॉगिन पेज वर जाऊ शकता .