Fact Check : Fact Check: मोदी देशात आर्थिक आणीबाणी लावणार?, ही बातमी खोटी आहे – fact check: article saying pm narendra modi likely to declare emergency in india is fake

[ad_1]

सोशल मीडियावर inventiva.co.in नावाच्या एका वेबसाइटवर एक बातमी छापली आहे. ही बातमी खूप शेअर केली जात आहे. या बातमीत दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम ३६० अंतर्गत देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे.

ही बातमी २३ मार्च २०२० रोजी छापण्यात आली आहे. या बातमीचे शीर्षक ‘Narendra Modi Likely To Declare A Emergency In India Under Article 360’असे आहे.

या बातमीच्या सुरुवातीलाच हा दावा करण्यात आला आहे. कलम ३६० काय आहे, आणि शेवटी हेही लिहिलेय की, जर अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी उचललेले पाऊल यशस्वी झाले नाही तर नरेंद्र मोदी यांच्याकडे कलम ३६० अंतर्गत देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यावाचून काहीच पर्याय उरणार नाही.


मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रात्री ८ वाजता COVID-19 संदर्भात देशवासीयांशी संवाध साधण्याचे ट्विट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर हे आर्टिकल खूप मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.

खरं काय आहे?

नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम ३६० नुसार देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करणार नाहीत.

टाइम्स फॅक्ट चेकने सरकारी सूत्रांशी यासंदर्भात चर्चा केली. सरकारी सूत्रांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment