[ad_1]
नागपूर : करोना विषाणूचे अचूक निदान करणारी भारतीय बनावटीची ‘टेस्टिंग किट‘ लोणावळ्यातील माय लॅब डिस्कव्हर सोल्युशन या कंपनीने बनविली आहे. ही किट विकसित करण्यात मूळ नागपूरकर डॉ. गौतम वानखेडे यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. वानखेडे हे या कंपनीत वैद्यकीय संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. वानखेडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून १९९५ साली वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर युरोपातील ब्रिस्टल येथून रक्त आणि संक्रमण या विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. डॉ. गौतम हे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितेचे माजी सचिव डॉ. रवी वानखेडे यांचे पुत्र आहेत. एका किटसाठी किमान साडेनऊ ते दहा हजार रुपये खर्च येतो. सोबतच लागणाऱ्या पीसीआर अर्थात पॉलिमरिक चेन रिअॅक्शन मशिनलाही मागणी आहे. जगातील बहुतांश देशांनी आपल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा थांबविल्या आहेत. त्यामुळे या किटचाही तुटवडा आहे. सध्या करोनाच्या निदानासाठी वापरली जाणारी किट जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधून आयात केली जाते. अशा स्थितीत डॉ. वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषाणूची जनुकीय साखळी शोधून काढण्यात यश मिळविले आहे. या संशोधनामुळे करोनाच्या निदानावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
कुठल्याही आजाराच्या अचूक निदानासाठी लागणाऱ्या साहित्याचे उत्पादन घेण्यासाठी भारतीय वैद्यकीय चिकित्सा परिषद (आयसीएमआर), अन्न व औषध प्रशासन, सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया, नॅशनल अॅक्रिडेशन ब्युरो ऑफ लेबॉरोटरी या स्वायत्त संस्थांच्या कठोर परीक्षांमधून जावे लागते. या सर्व चाचण्या सदर किटने पूर्ण केल्या आहेत. उत्पादनाला मान्यता मिळाली आहे. ‘जगभरातील नऊ कंपन्यांना करोनाचे किट बनविण्याची मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळवणारी मायलॅब ही भारतामधील एकमेव कंपनी आहे. आठ ते दहा दिवसांत ही किट तयार झाली. ही किट संपूर्ण भारतीय बनावटीची असल्याने कमी दरात करोनाचे निदान शक्य होणार आहे. सध्या दिवसाला दहा हजार किट बनविल्या जात आहेत. कामाची क्षमता वाढवून दिवसाला २५ हजार किट बनविण्याचा आमचा मानस आहे. या किटमुळे संबंधित व्यक्तीला कोरोना झाला आहे का, साधा व्हायरल फ्लू आहे का याची माहिती समजणार असल्याने ते प्रभावी ठरणार आहे’, असे ‘मायलॅब’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे व वितरण विभागाचे प्रमुख राहुल पाटील यांनी सांगितले.
WhatsApp वर सर्च करा आता फोटो, व्हिडिओ
रेडमी K20 सीरीजच्या ५० लाख फोनची विक्री
[ad_2]
Source link
Bài viết rất hữu ích, cảm ơn bạn đã chia sẻ!
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Web lừa đảo, đánh cắp thông tin người dùng, cảnh báo không nên truy cập!